TRENDING:

'अशांना 'टिपू'न 'टिपू'न मारलं असतं', कोणावर संतापला मराठी अभिनेता? शेअर केली सूचक पोस्ट

Last Updated:

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करण्याचा प्रयत्न केला. या विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे नाव महाराष्ट्राच्या जनतेसाठी अतिशय जवळचा विषय आहे. बरेचदा राज्याचं राजकारण याच नावाभोवती फिरताना दिसतं. अशातच जेव्हा मतांच्या राजकारणासाठी किंवा स्वार्थासाठी या आराध्य दैवताची तुलना इतर कोणाशी केली जाते, तेव्हा नागरिकांचा संताप अनावर होतो. सध्या राजकारणात अशाच एका विधानाने वणवा पेटवला आहे आणि या आगीत आता सिनेसृष्टीतील कलाकारांनीही उडी घेतली आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जाणारा मराठी अभिनेता अभिजीत केळकर याने या मुद्द्यावर अशी काही मार्मिक चपराक लगावली आहे की, त्याची पोस्ट सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
News18
News18
advertisement

अभिजीत केळकरची जळजळीत पोस्ट

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करण्याचा प्रयत्न केला. या विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली आहे. याच वादावर आपली प्रतिक्रिया देताना अभिजीत केळकरने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर एक जळजळीत पोस्ट शेअर केली.

शून्यातून उभं केलं 10 वर्षांचं साम्राज्य, एका 'हिरव्या पोळी'ने बदललं नशीब! काय आहे 'प्रसिका'ची Inside Story?

advertisement

अभिजीतनं लिहिलंय, "आज महाराज असते तर अशांना 'टिपू'न 'टिपू'न मारले असते..." अभिजीतने त्याच्या पोस्टमध्ये कोणताही थेट उल्लेख केला नसला, तरीही त्याने एका वाक्यात त्याने टिपू सुलतानचं नाव वापरून तुलना करणाऱ्यांना आरसा दाखवला आहे, असं म्हणत नेटकऱ्यांनी अभिजीतच्या या भूमिकेचं जोरदार समर्थन केलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

मालेगावमध्ये टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद सुरू असताना, पत्रकारांनी हर्षवर्धन सपकाळ यांना प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, "ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी शौर्य गाजवलं, त्यांचाच आदर्श घेऊन टिपू सुलतानाने इंग्रजांविरुद्ध लढा दिला. त्यामुळे शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानला शिवाजी महाराजांच्या समक्ष पाहिलं पाहिजे." या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सपकाळांवर कडक शब्दांत टीका केली. "मतांसाठी इतके जोडे चाटताना मी कोणाला पाहिलं नाही. शिवरायांनी हिंदूंना मुघलांच्या जाचातून सोडवलं, तर टिपूने हिंदूंच्या कत्तली केल्या. या दोघांची तुलना करणं निंदनीय आहे," असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं.

advertisement

राजकीय वादात कलाकारांची एन्ट्री

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एकाच शेतात घ्या वेगवेगळी पिकं, सोपी पद्धत अन् उत्पन्नातही वाढ, असा हा फॉर्म्युला
सर्व पहा

अभिजीत केळकर हा केवळ अभिनयासाठी नाही, तर सामाजिक आणि राजकीय विषयांवर व्यक्त होण्यासाठी ओळखला जातो. यापूर्वीही अनेकदा त्याने चुकीच्या प्रथांवर आणि विधानांवर सडेतोड भाष्य केलं आहे. टिपू सुलतान आणि शिवरायांच्या या तुलनेमुळे केवळ राजकारणच नाही, तर मराठी कलाविश्वही ढवळून निघालं आहे. शिवरायांच्या स्वराज्याची संकल्पना आणि टिपूची धोरणं यात जमीन-अस्मानाचा फरक असताना ही तुलना कशासाठी, असा सवाल आता सामान्य जनताही विचारत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
'अशांना 'टिपू'न 'टिपू'न मारलं असतं', कोणावर संतापला मराठी अभिनेता? शेअर केली सूचक पोस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल