नाटकात 'लक्ष्मी'ची अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. नाशिकच्या कवीमुळे आपल्याला ही भूमिका मिळाल्याचं नेहाने सांगितलं. नेहा जोशीने सांगितले की, "सखाराम बाईंडर हे नाटक 50 वर्षांपूर्वीचे असलं तरी त्याचा विषय आजही तितकाच महत्त्वाचा आहे. मला या नाटकातील लक्ष्मीची व्यक्तिरेखा खूप भावली. वरकरणी सहनशील आणि कमकुवत वाटणारी लक्ष्मी आतून खूप कणखर आहे. लग्नसंस्थेला मानणारी लक्ष्मी आणि त्या संस्थेच्या पूर्ण विरोधात असलेला सखाराम एकत्र आल्यावर त्यांचे नाते कसे जुळते, हे नाटकातून पाहायला मिळेल. 50 वर्षांनंतर आपण कलाकृती स्वीकारण्याच्या दृष्टीने किती पुढे आलो आहोत, हेही यानिमित्ताने समजून घेता येईल."
advertisement
नेहाला कशी मिळाली लक्ष्मीची भुमिका?
कवी प्रकाश होळकर यांनी नेहाचे नाव सयाजी शिंदे यांना सुचवलं. दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांच्या मनातही तिचं नाव होतं. नेहा म्हणाली, सयाजी शिंदेंसारख्या मोठ्या आणि अनुभवी कलाकारासोबत काम करण्यापूर्वी सुरुवातीला थोडं दडपण येणं स्वाभाविक होतं. पण जेव्हा ते एखादी भूमिका करतात तेव्हा ते केवळ एक कलाकार म्हणून तुमच्यासमोर येतात. त्यांच्या अभिनयात इतके समरस होतात की त्यांचे मोठेपण आणि नावाचा लौकिक आपोआप बाजूला सारला जातो. त्यांच्यासोबत काम करताना कलेप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि प्रामाणिकपणा जवळून अनुभवता आला. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं."
प्रेक्षकांना आवाहन
नेहाने प्रेक्षकांना नाटक पाहण्याचे आवाहन केले आहे. ती म्हणाली, "आता काळ बदलला आहे आणि कलाकारही वेगळे आहेत. तुम्हाला नाटक आवडेल किंवा नाही, तुमच्या सर्व प्रतिक्रिया आम्हाला कळवा. यामुळे आम्ही विजय तेंडुलकर यांच्या विचारांपर्यंत कितपत पोहोचू शकलो, हे समजून घेण्यास मदत होईल."