TRENDING:

'बसायचं नाही...' ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीसोबत असा वागला होता शाहरुख खान, सांगितलं सेटवर काय घडलं!

Last Updated:

Marathi Actress : ज्येष्ठ मराठी अभिनेत्रींना एकदा बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान "खाली नाही बसायचं", असं म्हणाला होता. जाणून घ्या काय आहे किस्सा...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

Marathi Actress Sulabha Arya : मराठी-हिंदी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा आर्य सध्या 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच नुकतचं राजश्री मराठील्या दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शाहरुख खान आणि 'कल हो ना हो'च्या शूटिंगदरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान शाहरुखने ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा आर्या यांची खूप काळजी घेतली होती. त्यांना काही त्रास होणार नाही याकडे त्याचं लक्ष असायचं.

advertisement

सुलभा आर्य म्हणाल्या,"कल हो ना हो'च्या शूटिंगच्यावेळी शाहरुख खान मला तालमीसाठी बसून देत नसे. रिहर्सलच्यावेळी तो इतर कोणालातरी बसवत असे आणि फायनल शॉटच्यावेळी मला बोलवायचा. आमचे सोबत सीन असताना मला काही त्रास होणार नाही, याची तो काळजी घ्यायचा. खाली-वर बसण्याचा सतत शॉट होता त्यावेळी या शॉटच्या रिहर्सलदरम्यान त्याने मला खाली बसू नका, असं स्पष्ट सांगितलं होतं. फायनल शॉटलाच त्याने मला बोलावलेलं. शाहरुख खान प्रचंड केअरिंग आहे. बॉलिवूडच्या कायम संस्मरणात राहणार्‍या पात्रांमध्ये 'कल हो ना हो' या चित्रपटातील कांताबेन या पात्राचा समावेश होतो. आजच्या इस्टांग्रामच्या या जगात कांताबेनच्या म्यूट रिअॅक्शनचे अनेक मीम्स बनतात.

advertisement

एका एपिसोडसाठी 18 लाख, 23व्या वर्षी 250 कोटींची मालकीण; TV अभिनेत्रीनं फॉलोअर्समध्ये SRKलाही टाकलं मागे

सुलभा आर्य पुढे म्हणाला,"माझा मुलगा कॅमरामन असल्याने त्याने यश जौहर, शाहरुख खानसोबत बरीच कामं केली आहेत. त्यामुळे यश जौहर यांना मी ओळखत होते. तर निखिल आडवाणी आमच्या घरी आलेला. मला म्हणाला,"काकी तुम्हाला डोळ्यासमोर ठेऊन 'कल हो ना हो' या चित्रपटात तुमच्या पात्राची निर्मिती करण्यात आली आहे. त्यावेळी मी कॉलेजमध्ये शिकवत असल्याने माझी नकारघंटा सुरू होती. त्याने माझ्याकडे 2-3 महिने मागितले. तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट होता. दुसरीकडे कॉलेजमध्ये मी लॉगिक आणि मानसशास्त्र शिकवत होते. त्यामुळे मी नसेल तर दुसरं कोण शिकवणार असा प्रश्न होता. अखेर आठ दिवसांवर माझा शूटिंगचा कालावधी ठरला. त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये मला या चित्रपटाचं शूटिंग करता आला. माझ्या पहिल्याच शॉटला यश जौहर बसलेला होता. यश जौहर यांची पत्नीही माझा पहिला शॉट बघायला बसली होती. पण रंगभूमी जास्त केल्याने आत्मविश्वास आला".

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
15 रुपयांला खरेदी करा अन् 30 ला विका, दिवाळीत करा आकर्षक लायटिंग व्यवसाय
सर्व पहा

मराठी बातम्या/मनोरंजन/
'बसायचं नाही...' ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीसोबत असा वागला होता शाहरुख खान, सांगितलं सेटवर काय घडलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल