दिवाळीचा सण हा आनंदाचा, उत्साहाचा आणि समृद्धीचा मानला जातो. प्रकाशाच्या या सणात भर घालते ती म्हणजे विविध प्रकारच्या लायटिंग. यंदा पुण्याच्या बुधवारपेठ बाजारात आकर्षक लायटिंगच्या माळा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पारंपरिक मातीच्या दिव्यांपासून ते स्मार्ट एलईडी स्ट्रिंग, लीफ माळा, कलर चेंजिंग बल्ब, रिमोट कंट्रोल दिवे अशा विविध प्रकारचे पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.
advertisement
Diwali 2025: दिवाळी शॉपिंगसाठी मुंबईत जबरदस्त ठिकाण, इथे मिळतायत 200 रूपयात सुंदर कुर्ते
यंदा चायनीज कंपन्यांसोबतच भारतीय कंपन्यांनी देखील मेड इन इंडिया लाइटिंगच्या नव्या रेंज बाजारात आणल्या आहेत. स्थानिक व्यवसायिकांनी सुद्धा चायनीज वस्तूंना टक्कर देण्यासाठी आकर्षक डिझाईन माफक दरात बाजारात उपलब्ध करून दिले आहेत.
लायटिंग व्यावसायिक विशाल सुखीजा म्हणाले की, यंदा बाजारात चायनीज ब्रँड सोबतच भारतीय ब्रँडच्या लायटिंगची मोठी आवक झाली आहे. लीफ लायटिंग, अत्याधुनिक दिव्याची लायटिंग, झालर लायटिंग अशा विविध प्रकारच्या लाइटिंगला ग्राहकांची मोठी मागणी आहे. ग्राहकांकडून चायनीज ब्रँडपेक्षा भारतीय ब्रँडला यंदा मोठी मागणी मिळत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
काय आहेत दर?
पणती लायटिंग माळा 15 रुपयांपासून ते 45 रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत, तर भारतीय ब्रँडच्या लायटिंग माळा 350 रुपयांपासून 450 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तर चायनीज ब्रँड माळा ह्या 45 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत मिळत आहेत. व्यापारी हे स्वस्तात खरेदी करून दुप्पट पैसे कमू शकता.
लाइटिंगच्या दरात 15 ते 20 टक्क्यांनी दरवाढ
मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी लायटिंगच्या दरात दरवाढ झाली आहे. भारतीय ब्रँड असलेल्या आणि चांगली क्वालिटी असलेल्या लायटिंगच्या किमतीत जवळपास 15 ते 20 टक्क्यांनी भाव वाढ झाली आहे.