Diwali 2025: दिवाळी शॉपिंगसाठी मुंबईत जबरदस्त ठिकाण, इथे मिळतायत 200 रूपयात सुंदर कुर्ते
- Reported by:Namita Suryavanshi
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Diwali 2025: दिवाळी जवळ आली की शॉपिंगची लगबग सुरू होते. पाच दिवसांच्या या सणात प्रत्येकजण वेगळा फेस्टिव्हल लुक करतो. यासाठी पारंपरिक आणि बजेटमध्ये मिळणारे कपडे शोधणाऱ्यांसाठी दादर पश्चिमेत एक खास ठिकाण आहे.
मुंबई: दिवाळी जवळ आली की शॉपिंगची लगबग सुरू होते. पाच दिवसांच्या या सणात प्रत्येकजण वेगळा फेस्टिव्हल लुक करतो. यासाठी पारंपरिक आणि बजेटमध्ये मिळणारे कपडे शोधणाऱ्यांसाठी दादर पश्चिमेत एक खास ठिकाण आहे.
दादर स्टेशनपासून फक्त दोन मिनिटांवर, विसावा हॉटेलसमोर असलेल्या या स्टॉलवर खणाचे लॉंग साईज कुर्ते फक्त ₹250 ला तर शॉर्ट खणाचे कुर्ते फक्त ₹200 ला मिळतात. याशिवाय इकतच्या डिझाइनचे लॉंग कुर्ते आणि शॉर्ट कुर्ती ₹200 ते ₹250 मध्ये उपलब्ध आहेत. जयपुरी कॉटन कुर्ते देखील इथे फक्त ₹200 पासून मिळतात.
सध्या खणाच्या कुर्त्यांची मोठी ट्रेंडिंग मागणी असल्याने ग्राहकांची विशेष गर्दी दिसत आहे. येथे जवळपास 25 पेक्षा अधिक रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत. स्मॉल, मीडियम, एक्सएल, थ्री एक्सएल, एक्स्ट्रा लार्ज अशा सर्व साईजचे पर्याय मिळतात. इतकेच नव्हे तर, ग्राहकांच्या मापाप्रमाणे खास कुर्ते शिवूनही दिले जातात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 05, 2025 8:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Diwali 2025: दिवाळी शॉपिंगसाठी मुंबईत जबरदस्त ठिकाण, इथे मिळतायत 200 रूपयात सुंदर कुर्ते









