Kitchen Tips : दिसत नाही पण लाकडी चमच्यामध्येही असू शकतात जंतू, 'या' युक्तीने करा अगदी स्वच्छ..
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Deep Cleaning Of Wooden Spoon : लाकूड सच्छिद्र असल्यामुळे सामान्यपणे गरम पाणी आणि डिटर्जंटने धुतल्यानंतरही, सूक्ष्मजीव त्याच्या पृष्ठभागाखाली घर करतात. विशेषतः जर लाकडी चमचे ओलेच ठेवले गेले, तर हे बॅक्टेरिया हळूहळू वाढू लागतात.
मुंबई : स्वयंपाकघरात वापरले जाणारे लाकडी चमचे दिसायला साधे असले तरी ते जीवाणू, तेल आणि मसाल्यांचे अंश अडकवून ठेवू शकतात. लाकूड सच्छिद्र असल्यामुळे सामान्यपणे गरम पाणी आणि डिटर्जंटने धुतल्यानंतरही, सूक्ष्मजीव त्याच्या पृष्ठभागाखाली घर करतात. विशेषतः जर लाकडी चमचे ओलेच ठेवले गेले किंवा त्यांना खोलवर स्वच्छ केले गेले नाही, तर हे बॅक्टेरिया हळूहळू वाढू लागतात. यामुळे अन्न दूषित होण्याची आणि आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता असते.
तुमच्या कुटुंबाचे आरोग्य जपण्यासाठी या लाकडी चमच्यांना वेळोवेळी योग्य पद्धतीने डीप क्लिनिंग करणे आवश्यक ठरते. लाकडी चमच्यांमध्ये असलेले मसाल्यांचे अंश, तेल आणि बॅक्टेरिया सामान्य धुण्याने पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला यावर एक उत्तम उअपय सांगत आहोत. याच्या साहाय्याने तुम्ही लाकडी चमच्यांना वेळोवेळी डीप क्लिनिंग करू शकाल.
सोशल मीडियावर बरेच आरोग्याविषयी जागरूक राहण्यासाठी लोकांना प्रेरित करत असतात. असेच thehealthengineers या अकाउंटवर केलेल्या एका पोस्टमध्ये लाकडी चमचे स्वच्छ करण्याची एक सोपी पद्धत सांगितली आहे.
advertisement
लाकडी चमच्यांमधील घाण पूर्णपणे काढून टाकण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स..
- सर्वात आधी एका भांड्यात पाणी घेऊन ते व्यवस्थित उकळून घ्या.
- त्यानंतर उकळत्या पाण्यात मीठ आणि व्हिनेगर घाला.
- आता तुमचे लाकडी चमचे या गरम द्रावणात 10 मिनिटांसाठी भिजत ठेवा.
advertisement
यानंतर तुम्हाला दिसेल की, थोड्याच वेळात चमच्यांमध्ये लपलेले तेल आणि इतर अवशेष बाहेर पडू लागतील. ही युक्ती खूप सोपी आणि अत्यंत परिणामकारक आहे. आपले आरोग्य जपणे ही आपली गरज आहे. तुम्ही एका वेळी फक्त एक जीवनशैलीतील बदल केला आणि त्याला तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवला, तर तुमच्या आरोग्यावर खूप मोठा सकारात्मक परिणाम झालेला दिसेल. छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही तुमचे आरोग्य सुधारू शकता.
advertisement
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 11:57 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : दिसत नाही पण लाकडी चमच्यामध्येही असू शकतात जंतू, 'या' युक्तीने करा अगदी स्वच्छ..