छत्रपती संभाजीनगर : 27 फेब्रुवारी हा दिवस ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. याच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांनी मराठी भाषिकांसाठी आपली कविता सादर केलीये. लोकल18 च्या माध्यमातून ‘खोडरबर’ ही कविता पाहुयात.
खोडरबर
ज्यांच्याजवळ आहे खोडरबर
advertisement
त्यांनी खुशाल चालवावी
बेभान पैन्सिल पुढ्यातल्या कागदावर
कोऱ्या कागदाला ठेवून साक्षी
कराव्यात असंख्य चुका
पेन्सिलचं टोक झिजू देत
डाईवरचा दिवा विझू देत
मात्र धावू देते दुड् दृडू अक्षर
मनमौजी अंगणात
खोडून-खोडून कागद होईल काळा
फाटून- चुरगळून होईल चोळामोळा,
पुन्हा नव्या कागदावर टेकलं पाहिजे
पेन्सिलचं टोक नव्या इराद्यासह
खोडरबरासारखीच
स्वच्छ झाडझड करून मावळतो दिवस,
उगवलेल्या प्रत्येक दिवसाजवळ असतो
एक नवा कोरा कागद कागद
फक्त
आपण स्वतःचा एक शब्द
पाहिजे लिहिला
उगवेलेल्या शुभ्र दिवसावर.
जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा प्रत्येक माणसाला वाटतं की आपल्याकडून ही गोष्ट करायची राहून गेली किंवा माझ्याकडून या चुका झाल्या. तर त्या चुका सुधारण्यासाठी किंवा नवीन चुका करण्यासाठी नवीन दिवस येत असतो. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक चूक सुधारण्याची दुसरी संधी मिळत असते. आपण अशा चुका पुन्हा टाळल्या पाहिजेत, अशा आशयाची ही कविता असल्याचं दासू वैद्य सांगतात.