मुंबई : फक्त हिंदीच नाही तर आता मराठीतही सस्पेन्स, थ्रिलर आणि हॉरर सिनेमे येऊ लागले आहेत. असाच एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाची स्टोरीच डोकं चक्रावणारी आहे. सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या निमित्तानं प्रेक्षकांना पुन्हा एकदा कोकणातील निसर्गरम्य लोकेशन मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सिनेमाची स्टोरी खतरनाक असल्याचं दिसतंय.
advertisement
छबी असं सिनेमाचं नाव आहे. एक फोटोग्राफर आहे जो कोकणातील एका मुलीचे फोटो काढतो. पण तिचे फोटो काढल्यानंतर त्याला एक विचित्र अनुभव येतो. त्या मुलीचे फोटो तो सगळ्यांना दाखवतो पण फोटोतील ती मुलगी त्याला सोडून इतर कोणालाही दिसत नाही.
( पहिला सीन पाहूनच झोप उडेल, क्लायमॅक्स तर डोकं फिरवणारा; OTT वर टॉप ट्रेंडिंग आहे सिनेमा )
जुन्या नव्या कलाकारांची फौज
या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन अद्वैत मसूरकर यांचं आहे. सिनेमात समीर धर्माधिकारी, मकरंद देशपांडे, शुभांगी गोखले, राजन भिसे, संजय कुलकर्णी, लीना पंडित यांच्याबरोबरच ध्रुव छेडा, सृष्टी बाहेकर, अनघा अतुल, रोहित लाड, ज्ञानेश कदम हे नवोदित कलाकारही आहेत.
ट्रेलरमध्ये काय?
2 मिनिट 27 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये एका फोटोग्राफी स्पर्धेसाठी एक तरूण फोटोग्राफराला फोटो पाठवायचे असतात. त्यासाठी तो कोकणात जातो. कोकणात जाऊन एका मुलीचे फोटो काढलेले असतात. प्रत्यक्षात त्या फोटोत कुणीच दिसत नाही. पण त्या फोटोग्राफरला त्या फोटोत मुलगी दिसत असते. या फोटोमागे काय कहाणी आहे ? ती मुलगी कोण असते? या प्रश्नांची उत्तरं मोठ्या पडद्यावरच पाहायला मिळणार आहेत. निसर्गसंपन्न कोकणाच्या पार्श्वभूमीवरची एक गूढरम्य गोष्ट छबी या चित्रपटांतून मांडण्यात आली आहे.
आता फोटोग्राफरला फोटोमध्ये दिसणारी ती मुलगी खरचं जीवंत आहे की ती कोणती सुपरनॅचरल पावर आहे हे सिनेमा पाहिल्यानंतरच कळणार आहे. सिनेमा येत्या 25 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.