मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केट, जे सीएसटी रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर आहे, इथे केवळ शंभर रुपयांमध्ये तुम्हाला विविध डिझाईन्सचे इम्पोर्टेड ग्लासेस मिळतात.
Navratri Shopping: गरब्यासाठी खास दुपट्टा शोधताय? दादरमधील या दुकानात होईल 250 रुपयांत खरेदी
उपलब्ध डिझाईन्स:
एव्हिएटर ग्लासेस – क्लासिक आणि स्टायलिश, पुरुष आणि महिला दोघांसाठीही योग्य.
advertisement
कॅट-आय ग्लासेस – पारंपरिक साड्यांसोबत एकदम आकर्षक लुक देणारे.
ओव्हरसाईज्ड सनग्लासेस – एथनिक ड्रेसेस किंवा ट्रेडिशनल लुकसाठी परफेक्ट.
राऊंड रेट्रो ग्लासेस – ट्रेंडी आणि तरुणांसाठी खास.
स्पोर्टी रॅपराउंड्स – उन्हाळ्यासाठी, तसेच स्ट्रीट-फॅशन लुकसाठी उत्तम.
काचेचे (स्क्रीन) प्रकार:
साधे सन-प्रोटेक्टिव्ह लेन्सेस – उन्हापासून डोळ्यांचे रक्षण करणारे.
यूव्ही प्रोटेक्शन लेन्सेस – डोळ्यांना सूर्यकिरणांच्या हानीपासून वाचवणारे.
टिंटेड कलर लेन्सेस – फॅशन आणि फेस्टिवल दोन्हीसाठी स्टायलिश पर्याय.
क्रॉफर्ड मार्केट हे आधीपासूनच होलसेल दरांसाठी प्रसिद्ध आहे. फेस्टिवल सीझनमध्ये येथे मिळणारे हे ग्लासेस केवळ वैयक्तिक वापरासाठीच नव्हे, तर किरकोळ विक्री (रिटेल) व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठीही उत्तम संधी ठरत आहेत.
ब्लू-रे कट लेन्सेस – मोबाईल, लॅपटॉप स्क्रीनच्या निळ्या प्रकाशापासून डोळ्यांचे रक्षण करणारे यांची किंमत 100 ते 250 रुपयापर्यंत पर्यंत आहे.
किंमत:
सर्व प्रकारचे इम्पोर्टेड ग्लासेस फक्त 100 रुपयांमध्ये आहेत.
स्क्रीन/लेन्स प्रोटेक्शन 100 ते 250 रुपयांमध्ये आहेत.