advertisement

Navratri Shopping: गरब्यासाठी खास दुपट्टा शोधताय? दादरमधील या दुकानात होईल 250 रुपयांत खरेदी

Last Updated:

Navratri Shopping: नवरात्रीत गरबा-दांडियासाठी लागणाऱ्या रंगीबेरंगी कपड्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत.

+
Navratri

Navratri Shopping: गरब्यासाठी खास दुपट्टा शोधताय? दादरमधील या दुकानात होईल 250 रुपयांत खरेदी

मुंबई: येत्या 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. तरुणाईला हा उत्सव विशेष आवडतो. कारण, नवरात्रीच्या काळात ठिकठिकाणी गरबा आणि दांडियाचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमांमध्ये तरुणाई धुंद होऊन थिरकते. नवरात्रीत गरबा-दांडियासाठी लागणाऱ्या रंगीबेरंगी कपड्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. दादर वेस्टला असलेल्या प्रसिद्ध 'मासूमी साडी सेंटर'मध्ये सध्या गरब्याच्या हंगामासाठी खास दुपट्ट्यांचं (ओढणी) कलेक्शन उपलब्ध झालं आहेत.
नवरात्र आणि गरबा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा उत्साह चांगलाच वाढलेला असून त्यानुसार दुकानात रंगीबेरंगी, आकर्षक आणि ट्रेंडी दुपट्ट्यांची मोठी रेंज उपलब्ध करून देण्यात आली आहे. या खास कलेक्शनमध्ये पारंपरिक आणि मॉडर्न स्टाईलचा सुरेख संगम पाहायला मिळत आहे. दुपट्ट्यांची किंमत 250 रुपयांपासून सुरू होत असल्याने ग्राहक मोठ्या संख्येने खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
advertisement
'मासूमी साडी सेंटर'मध्ये बांधणी, कॉटन सिल्क, पैठणी, मलमल अशा विविध प्रकारांचे दुपट्टे उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रकारात 10 ते 12 रंगांचे पर्याय मिळत आहेत. हत्ती प्रिंट असलेला दुपट्टा 350 रुपयांना तर कलरफुल दुपट्टा 250 रुपयांपासून मिळत आहे. आर्ट सिल्कचा प्रिंटेड दुपट्टा 400 रुपयांना आणि मिरर वर्क असलेला दुपट्टा 350 रुपयांना उपलब्ध आहे. यासोबतच मोरांचं वर्क असलेला हेवी दुपट्टा आणि जॉर्जेट ग्लास वर्क असलेला दुपट्टा दोन्ही 550 रुपयांना खरेदी करता येत आहेत.
advertisement
या दुकानात असलेल्या स्टायलिश गरबा धोतीही ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. ही धोती 500 रुपयांना मिळत असून त्यामध्ये 8 ते 10 रंगांचे पर्याय आहेत. याशिवाय पारंपरिक लुकसाठी खास पैठणी शेला 450 रुपयांना आणि प्युअर सिल्क शेला 700 रुपयांना उपलब्ध आहे. पैठणी शेलामध्ये तब्बल 25 ते 30 रंग ग्राहकांना निवडण्यासाठी मिळत आहेत.
advertisement
दादरच्या पाणेरी दुकानाच्या लाइनमध्ये सफारी शॉपच्या अपोझिट असलेलं 'मासूमी साडी सेंटर' हे दुकान सध्या गरब्याच्या खरेदीसाठी एक हॉटस्पॉट ठरलं आहे. दुकानदारांनी आत्मविश्वासाने सांगितलं की, "संपूर्ण दादरमध्ये अशा प्रकारची व्हरायटी आणि क्वालिटी दुसरीकडे कुठेही मिळणार नाही." तुम्हाला देखील नवरात्रीसाठी खरेदी करायची असेल तर हे दुकान चांगला पर्याय ठरू शकतं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navratri Shopping: गरब्यासाठी खास दुपट्टा शोधताय? दादरमधील या दुकानात होईल 250 रुपयांत खरेदी
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement