हिरव्या मिरचीचा ठेचा साहित्य
अर्धा पाव हिरवी मिरची, अर्धी वाटी शेंगदाणे, लसूण, तेल, मीठ, लिंबाचा रस, आलं, कोथिंबीर (आवश्यकतेनुसार) हे साहित्य लागेल.
Recipe Video: घरीच बनवा रेस्टॉरंट स्टाईल पनीर क्रिस्पी; सोपी रेसिपी वाचा
हिरव्या मिरचीचा ठेचा कृती
सर्वप्रथम हिरव्या मिरच्यांचे देठ काढून त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्या. नंतर त्या धुतलेल्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून घ्यावे. त्यानंतर एका लोखंडी कढईत तेल गरम करावे. तेल गरम झाले की हिरव्या मिरचीचे बारीक केलेले तुकडे नीट भाजून घ्यावे. नंतर लसूण आणि शेंगदाणे देखील चांगले खरपूस भाजून घ्यावे.
advertisement
भाजलेल्या मिरच्या आणि शेंगदाणे लसूण नीट मिक्स करावे. हे मिश्रण थंड झाल्यावर खलबत्त्यात ठेचा (खलबत्त्यात ठेचून केला जातो म्हणूनच याला ठेचा म्हणतात). याचा तिखटपणा कमी करण्यासाठी वरून लिंबाचा रस घालावा. आपला हा हिरव्या मिरचीचा ठेचा तयार आहे. तुम्ही हा ठेचा गरमागरम भाकरी, पोळीसोबत खाऊ शकता.
टीप:
1. जास्त काळ टिकवण्यासाठी यात लिंबाचा रस वापरला जातो.
2. हा ठेचा बनवताना खलबत्त्यात ठेचल्यामुळे त्याला अस्सल गावरान चव येते.





