दिलीप प्रभावळकरांचं काम पाहून भारावल्या शर्मिला ठाकरे
‘दशावतार फिल्म्स’ या इंस्टाग्राम अकाउंटवर शर्मिला ठाकरे यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या, “आताच मी ‘दशावतार’ सिनेमा पाहिला. मला असं वाटतं की, महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने हा चित्रपट पाहिलाच पाहिजे.”
शर्मिला यांनी पुढे सांगितलं, “राजचं जे म्हणणं असतं आणि त्याच्या भाषणात देखील अनेकदा त्याने सांगितलंय की, कोकणातील जमिनी आपण विकू नयेत. यामुळे निसर्गाची सुद्धा वाट लागतेय, हा संदेश सिनेमातून देण्याचा प्रयत्न केलाय. आपण प्रत्येकाने पाहायला पाहिजे असा हा सिनेमा आहे.”
advertisement
नव्या शोमध्ये नवं अफेअर! निक्की तांबोळीला Cheat करतोय अरबाज पटेल? 'त्या' VIDEO मुळे तापलं वातावरण
त्यांनी दिलीप प्रभावळकरांच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं. त्या म्हणाल्या, “मी दिलीप काकांना मनापासून नमस्कार करेन. माझ्या वडिलांच्या काळापासून ते काम करतायत. आता त्यांचं वय ८०च्या पुढे असेल. पण त्यांची एनर्जी कमाल आहे. त्यांनी इतकं अप्रतिम काम केलंय की, माझ्याकडे शब्दच नाहीयेत. त्यांना मेकअपला एक-दोन तास लागले असणार… हॅट्स ऑफ! त्यांना”
सिनेमातील कोकण पाहून तृप्त झालो!
शर्मिला यांनी चित्रपटातील इतर कलाकारांचंही कौतुक केलं. त्या म्हणाल्या की, दिग्दर्शक सुबोध भावेने कोकणात खूप छान शूटिंग केलं आहे. सिनेमातील कोकण पाहूनच त्या खूप खुश झाल्या.
‘दशावतार’ने बॉक्स ऑफिसवर १२ दिवसांत १९ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत या चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, महेश मांजरेकर आणि भरत जाधव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.