TRENDING:

Model Sheetal Murder : प्रसिद्ध मॉडेलची निर्घृण हत्या, गळा चिरुन कालव्यात फेकून दिलं!

Last Updated:

Model Sheetal Murder Case: क्राइमच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशातच आता आणखी एक हादरवणारी घटना समोर आली आहे. एका प्रसिद्ध मॉडेलची हत्या झाली आहे. तरुणीचा मृतदेह कालव्यात सापडल्यमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  क्राइमच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशातच आता आणखी एक हादरवणारी घटना समोर आली आहे. एका प्रसिद्ध मॉडेलची हत्या झाली आहे. तरुणीचा मृतदेह कालव्यात सापडल्यमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. मॉडेलच्या हत्याकांडाने संपूर्ण देश सुन्न झालाय.
प्रसिद्ध मॉडेलची निर्घृण हत्या
प्रसिद्ध मॉडेलची निर्घृण हत्या
advertisement

हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील खरखोडा परिसरातील रिलायन्स कालव्यात आढळलेल्या एका तरुणीच्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ माजली आहे. मृत तरुणीची ओळख शीतल चौधरी (स्टेज नाव - सिम्मी चौधरी) या हरियाणवी मॉडेल म्हणून झाली असून ती पानिपत जिल्ह्यातील खलीला मजरा गावची रहिवासी होती.

5 वर्षात 11 चित्रपट करणारी अभिनेत्री, 22 व्या वर्षी प्रेमात दिला जीव, करिअरच्या पीकवर घडलं भयानक

advertisement

शीतल अलीकडेच तिच्या बहिणीबरोबर पानिपतच्या सत्कर्षण कॉलनीत राहत होती. 15 जून रोजी ती बेपत्ता झाली होती आणि तिच्या बहिणीने याबाबत जुना औद्योगिक क्षेत्र पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 16 जून रोजी, शीतलचा मृतदेह कालव्यात तरंगताना सापडला. मृतदेह पाहिल्यावर तिच्या मानेवर धारदार शस्त्राचे खोल वार आढळून आले, ज्यामुळे ही हत्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

advertisement

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. सोनीपत आणि पानिपत पोलिसांचे संयुक्त पथक या प्रकरणाचा तपास करत असून, पोलिस विविध शक्यतांचा विचार करत आहेत त्यात प्रेमप्रकरण, खाजगी वाद असल्याचा संशय आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात लिंबूचे दर तापले, कांद्याला सरासरी दर, APMC मार्केटमधून नवी अपडेट
सर्व पहा

शीतलची लोकप्रियता हरियाणवी म्युझिक इंडस्ट्रीत वाढत होती, त्यामुळे पोलिस त्या क्षेत्रातील काही व्यक्तींशीही चौकशी करत आहेत. तिचे कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज आणि लोकेशन हिस्ट्री तपासण्यात येत आहे. या घटनेमुळे राज्यातील महिला सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांकडून या गुन्ह्याच्या जलद उकल होण्याची आणि आरोपींना कठोर शिक्षा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Model Sheetal Murder : प्रसिद्ध मॉडेलची निर्घृण हत्या, गळा चिरुन कालव्यात फेकून दिलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल