TRENDING:

Mrs. Deshpande नंतर माधुरी दीक्षितचा हॉट अवतार, तृप्ती डिमरीसोबत करणार अतरंगी कांड, Maa Behen चा टीझर Viral

Last Updated:

Maa Behen Teaser: 'भूल भुलैया ३' मधील त्यांच्या जबरदस्त जुगलबंदीनंतर, ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बॉलिवूडची 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित आणि सध्याची नॅशनल क्रश तृप्ती डिमरी जेव्हा एकाच पडद्यावर येतात, तेव्हा काहीतरी धमाकेदार घडणार हे नक्की! 'भूल भुलैया ३' मधील त्यांच्या जबरदस्त जुगलबंदीनंतर, ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नेटफ्लिक्सचा नवा कोरा चित्रपट 'माँ-बहन' (Maa Behen) मध्ये त्या डार्क कॉमेडी करताना दिसणार आहेत. मात्र, यावेळी हा खेळ एकाच घरातील आई आणि मुलींच्या नात्यातील गोड-कडू भांडणांचा आणि एका भयंकर कांडचा असणार आहे.
News18
News18
advertisement

नेटफ्लिक्स इंडियाने या चित्रपटाची घोषणा करताना एक मजेशीर टीझर शेअर केला आहे. ज्याला त्यांनी कॅप्शन दिलंय, "एक आई, दोन बहिणी आणि एक अतिशय भयंकर कांड!" टीझरवरून स्पष्ट होतंय की, माधुरी दीक्षित यात एका बिनधास्त आईच्या भूमिकेत दिसणार आहे, तर तृप्ती डिमरी तिच्या मोठ्या लेकीच्या भूमिकेत असेल. या दोघींच्या नात्यातील चढ-उतार, विनोदी प्रसंग आणि घरगुती ड्रामा हे या चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

advertisement

माधुरी-तृप्तीच्या साथीला तगडी स्टारकास्ट

केवळ माधुरी आणि तृप्तीच नाही, तर या चित्रपटाची स्टारकास्ट अतिशय हटके आहे. छोटी बहीण म्हणून प्रसिद्ध डिजिटल कंटेंट क्रिएटर धर्ना दुर्गा यामध्ये दिसणार आहे, जिच्या कॉमेडीचे लाखो चाहते आहेत. तसेच, अष्टपैलू अभिनेता रवी किशन एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून, त्यांच्या येण्याने कथेला एक वेगळेच वळण मिळणार आहे. अनुभवी कलाकार आणि नव्या दमाच्या नवोदित कलाकारांचा हा मिलाफ प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानीच असेल.

advertisement

लग्नानंतर प्राजक्ता गायकवाडचा पहिलाच चित्रपट, 'महाराणी येसुबाईं'नंतर साकारणार 'ही' ऐतिहासिक भूमिका

'तुम्हारी सुलू' आणि 'जलसा' सारखे संवेदनशील आणि तितकेच रंजक चित्रपट देणारे सुरेश त्रिवेणी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पात्रांच्या भावभावनांशी खेळण्यात त्यांचा हातखंडा आहे, त्यामुळे 'माँ-बहन' हा केवळ विनोदी चित्रपट न राहता मनाला भिडणारी एक कौटुंबिक कथा ठरेल, अशी अपेक्षा आहे. अबुदंशिया एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, मे २०२५ पासून मुंबईत याचं चित्रीकरण सुरू होतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मुलांचे कपडे फक्त 150 रुपयांपासून करा खरेदी, कल्याणमधील हे ठिकाण माहितीये का?
सर्व पहा

नेटफ्लिक्स ओरिजिनल म्हणून प्रदर्शित होणारा हा चित्रपट जागतिक स्तरावरील प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आला आहे. माधुरीचा चिरतरुण वावर आणि तृप्तीची वाढती लोकप्रियता यांचा हा कॉम्बो डिजिटल प्लॅटफॉर्मवर नक्कीच धमाका करेल.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Mrs. Deshpande नंतर माधुरी दीक्षितचा हॉट अवतार, तृप्ती डिमरीसोबत करणार अतरंगी कांड, Maa Behen चा टीझर Viral
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल