TRENDING:

Mrunal Thakur: मृणाल ठाकूर सुधारली नाही, बिपाशानंतर अनुष्का शर्मावर साधला निशाणा? म्हणाली, 'ती काम करत नाही..'

Last Updated:

Mrunal Thakur: बॉलिवूड आणि साऊथमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री मृणाल ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बॉलिवूड आणि साऊथमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री मृणाल ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अजय देवगणसोबत नुकतीच प्रदर्शित झालेल्या सन ऑफ सरदार 2 नंतर तिच्या अभिनयापेक्षा तिच्या विधानांमुळे ती हेडलाईन्समध्ये आहे. आता मृणालचं आणखी एक नवं वादग्रस्त वक्तव्य व्हायरल होत आहे. तिने यामध्ये अनुष्का शर्मावर निशाणा साधला आहे.
मृणाल ठाकूरने अनुष्का शर्मावर साधला निशाणा?
मृणाल ठाकूरने अनुष्का शर्मावर साधला निशाणा?
advertisement

काही दिवसांपूर्वी कुमकुम भाग्यच्या दिवसातील तिचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात तिने अभिनेत्री बिपाशा बसूला ‘मस्क्युलर’ म्हटले होते. या वक्तव्यावरून तिला जोरदार ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. शेवटी मृणालला माफी मागावी लागली. आता पुन्हा एकदा तिच्या मुलाखतीतून वाद निर्माण झाला आहे.

प्रिया मराठेने मागे सोडली इतक्या कोटींची संपत्ती, आकडा थक्क करणारा!

advertisement

मृणाल ठाकूरचा नवा वाद

मिस मालिनीला दिलेल्या खास मुलाखतीत तिला विचारले गेले की, तिने नाकारलेले चित्रपट नंतर सुपरहिट ठरले. त्यावर मृणाल म्हणाली, “मी अनेक मोठे चित्रपट नाकारले. कारण मी तेव्हा तयार नव्हते. हो, नंतर त्या चित्रपटांमध्ये दुसऱ्या अभिनेत्रीने मोठं स्थान मिळवलं. पण आता त्या काम करत नाहीत. पण मला वाटतं जर मी तेव्हा ते केलं असतं तर मी स्वतःला हरवून बसले असते. मला त्वरित लोकप्रियता नको होती. मी आजही काम करत आहे, हेच माझं मोठं यश आहे.”

advertisement

मृणालने या मुलाखतीत कोणाचंही नाव घेतलं नाही. पण सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिचं वक्तव्य थेट अनुष्का शर्माशी जोडले आहे. कारण चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे सलमान खानसोबतचा सुल्तान. या चित्रपटाची ऑफर मृणालला मिळाली होती, पण तिने ती नाकारली आणि ती भूमिका अनुष्काने केली. सुल्तान सुपरहिट ठरला आणि अनुष्का बॉलिवूडमधील टॉप हिरोईन्समध्ये गणली जाऊ लागली.

advertisement

mrunal thakur

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तहसीलदाराच्या टेबलावर पैशाचा पाऊस, जालन्यात खळबळ, नेमकं काय घडलं? Video
सर्व पहा

यावर अनेक युजर्सनी मृणालला टोला लगावला. एका युजरने लिहिले, “ही वाईट एनर्जी आहे. स्वतःला मोठं दाखवण्यासाठी दुसऱ्यांना कमी दाखवणं चुकीचं आहे.” तर दुसरा युजर म्हणाला, “अनुष्काने तिच्या कुटुंबासाठी ब्रेक घेतला, ते तिचं वैयक्तिक यश आहे. तुला त्याच्यात विजय कसा दिसतो?”

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Mrunal Thakur: मृणाल ठाकूर सुधारली नाही, बिपाशानंतर अनुष्का शर्मावर साधला निशाणा? म्हणाली, 'ती काम करत नाही..'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल