मुन्नवरची गर्लफ्रेंड नाजिला हिनं अनेक खुलासे केले आहेत. 'आयशा आणि मुन्नवर यांचं अफेअर होतं हे मला माहिती नव्हतं. मला यापासून पूर्णपणे अलिप्त ठेवण्यात आलं होतं. त्याच्या आयुष्यात मी एकमेव मुलगी आहे असं मला भासवलं होतं. मुन्नवरनं अनेक मुलींबरोबर अफेअर केलेत. पण मला त्यातील कोणाचंही नाव घ्यायचं नाहीये', असं म्हणत तिनं इन्स्टाग्रामच्या लाइव्ह मध्ये मुन्नवरबरोबर ब्रेकअपची घोषणा केली.
advertisement
नाजिला पुढे म्हणाली, 'मी हे सगळं कळल्यानंतर शांत बसले कारण त्याला काय म्हणायचं आहे आणि तो ती गोष्ट कशाप्रकारे योग्य आहे हे दाखवतोय हे मला पाहायचं होतं. तो फक्त खोटं बोलल होता आणि मी या सगळ्यावर समाधानी नाही. मला कोणालाच स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. पण गोष्टी इतक्या लेव्हलपर्यंत वाढत गेल्या ज्यामुले मला लाइव्ह यावं लागलं आणि माझी बाजू मला मांडावी लागली'.
कंगना रणौतच्या लॉकअप शोमध्ये मुन्नवर फारूकीनं नाजिलाबरोबर असलेल्या नात्याची कबूली दिली होती. दोघेही डेट करत होते. नाजिला त्याच्यासाठी खास पोस्ट देखील लिहायची. लॉकअप शो जिंकल्यानंतर मुन्नवर आणि नाजिला हातात हात घेत सेलिब्रेशन केलं होतं.