कंगनानं दिला आश्चर्याचा धक्का! वडिलांनी दिली माहिती, 'या' पक्षाकडून अभिनेत्री लढवणार लोकसभा निवडणूक

Last Updated:

कंगना निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांवर तिचे वडील अमरदीप रणौत यांनी मोहोर उमटवली आहे.

'या' पक्षाकडून अभिनेत्री कंगना रणौत लढवणार लोकसभा निवडणूक
'या' पक्षाकडून अभिनेत्री कंगना रणौत लढवणार लोकसभा निवडणूक
मुंबई, 19 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत 2024च्या लोकसभा निवडणूक लढवणार अशा चर्चा होत्या. मात्र कंगनानं यावर कधीच स्पष्टपणे सांगितलं नाही. पण आता लोकसभा निवडणूकीला काही महिने शिल्लक असताना अखेर कंगना निवडणूक लढवणार असल्याची माहिती कन्फर्म झाली आहे. स्वत: कंगनाच्या वडिलांनी ही माहिती दिली आहे. कंगना 2024च्या लोकसभा निवडणूक लढवणार आहे. कंगना निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांवर तिचे वडील अमरदीप रणौत यांनी मोहोर उमटवली आहे. आता भाजप ठरवेल की माझी मुलगी कंगना कुठून निवडणूक लढवणार आहे, असं त्यांनी म्हटलंय.
कंगनाचे वडील अमरदीप रणौत यांनी स्पष्ट केलं आहे की, कंगना भाजप पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. पण ती कोणत्या ठिकाणाहून निवडणूक लढवणार आहे हे पक्षानं ठरवायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे कंगनानं दोन दिवस आधी कुल्लू येथील आपल्या घरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीत निवडणूकीसंबंधी बोलणं झाल्याचं म्हटलं जातंय. कंगाने दोघांच्या भेटीचे फोटो शेअर केलेत.
advertisement
इतकंच नाही तर मागील आठवड्यात कंगना हिमाचलच्या बिलासपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सोशल मीट कार्यक्रमातही गेली होती. या ठिकाणी कंगनानं म्हटलं होतं की, RSSचे विचार तिच्या विचारधारेशी मिळते जुळते आहेत. कंगनाही मंडी लोकसभा सीटवर चंदीगडमधून निवडणूक लढवेल अशा चर्चा आहेत.
advertisement
कंगना मंडी जिल्ह्यातून निवडूक लढण्याच्या शक्यता अधिक आहे कारण कंगना मूळची मंडी जिल्ह्यातील सरकाघाट विधानसभा मतदारसंघातील भांबला गावची रहिवासी आहे. तिनं मागील काही वर्षांआधी मनालीमध्ये त्यांनी स्वतःचं घर बांधलं आहे. त्यामुळे तिचं संपूर्ण कुटुंब आता मनालीतच राहतं.
इतकंच नाही तर काही महिन्यांपूर्वी कंगना रणौतनं गुजरातमधील द्वारका येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की, जर देवाचा आशीर्वाद असेल तर ती नक्कीच निवडणूक लढवेल. यानंतर कंगना निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला.
मराठी बातम्या/मनोरंजन/
कंगनानं दिला आश्चर्याचा धक्का! वडिलांनी दिली माहिती, 'या' पक्षाकडून अभिनेत्री लढवणार लोकसभा निवडणूक
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement