TRENDING:

Aishwarya-Salman : 'ऐश्वर्या-सलमान इतके जवळ होते की त्यांचं भांडण...' प्रसिद्ध संगीतकाराचा शॉकिंग खुलासा

Last Updated:

Aishwarya-Salman: बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत राहिलेलं कपल म्हणजे सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय. बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात चर्चित आणि वादग्रस्त प्रेमप्रकरणांपैकी एक.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत राहिलेलं कपल म्हणजे सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय. बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात चर्चित आणि वादग्रस्त प्रेमप्रकरणांपैकी एक. आजही त्यांच्याविषयी चर्चा होते आणि नवनवीन माहिती समोर येत असते. अशातच आता सलमान ऐश्वर्याच्या नात्यावर प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाने खुलासा केला आहे.
ऐश्वर्या-सलमान
ऐश्वर्या-सलमान
advertisement

बॉलिवूडमधील नामांकित संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार हे नेहमीच त्यांच्या प्रभावी संगीतामुळे ओळखले जातात. 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास' यांसारख्या चित्रपटांना त्यांनी दिलेलं संगीत आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहे. पण अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत इस्माईल दरबार यांनी पडद्यामागील काही अज्ञात गोष्टी उघड केल्या ज्यात संजय लीला भन्साळींसोबतचं त्यांचं नातं, आणि सलमान खान–ऐश्वर्या राय यांच्या प्रेमकथेबद्दलच्या आठवणी होत्या.

advertisement

अरबाज खानने ठेवलं मुलीचं नाव, अर्थ आहे खूपच खास; पोस्ट शेअर करत म्हणाला...

मुलाखतीत इस्माईल दरबार यांनी सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्याबद्दलही मनमोकळं बोलले. त्यांच्या म्हणण्यानुसार, "त्या दोघांमध्ये खूप प्रेम होतं, पण काही गैरसमजांमुळे त्यांचं नातं बिघडलं. त्यांच्या भांडणांच्या बातम्या त्या काळी सर्वत्र झळकत होत्या.

आम्हाला खूप वाईट वाटलं… ते इतके जवळचे होते की त्यांचं असं तुटणं बघवत नव्हतं. ते दृश्य खरंच वेदनादायक होतं." त्यांनी पुढे सांगितलं की, "आज सलमान खूप परिपक्व झाला आहे. तो त्या गोष्टींवर बोलत नाही, भूतकाळ विसरून पुढे चाललाय आणि हेच त्याचं मोठेपण आहे."

advertisement

इस्माईल दरबार म्हणाले, "जेव्हा मला कामाची गरज होती, तेव्हा भन्साळींनी मला हम दिल दे चुके सनम दिला. आणि जेव्हा त्यांना माझी गरज होती, तेव्हा मी बाकी सगळं सोडून त्यांच्यासाठी काम केलं. ते माझे गॉडफादर होते."

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शोरमा विकून महिन्याला किती कमाई होऊ शकते? प्रणयचं इन्कम पाहून तुम्ही कराल कौतुक!
सर्व पहा

पण नंतर त्यांच्या नात्यात तणाव आला. कारण होतं, देवदास. भन्साळींनी या चित्रपटात शाहरुख खानला मुख्य भूमिकेसाठी निवडलं,आणि याच निर्णयामुळे सलमान खान नाराज झाला, असं इस्माईल दरबार यांनी सांगितलं. तो म्हणाला, "खामोशी फ्लॉप झाला तेव्हाही सलमानने भन्साळींचा साथ दिला होता. पण जेव्हा त्यांनी देवदास साठी शाहरुखला साइन केलं, तेव्हा सलमानचं मन दुखावलं. जर एखाद्याने तुम्हाला दोनदा साथ दिली आणि तिसऱ्यांदा तुम्ही त्याच्या स्पर्धकाला घेतलंत, तर राग येणं साहजिक आहे ना?"

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Aishwarya-Salman : 'ऐश्वर्या-सलमान इतके जवळ होते की त्यांचं भांडण...' प्रसिद्ध संगीतकाराचा शॉकिंग खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल