अभिनेत्री भारती आचरेकर यांनी सोशल मीडियावर त्यांच्या गुरूंसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. विजया मेहता असं त्यांचं नाव आहे. विजया मेहता यांनी नुकताच त्यांचा 91 वा वाढदिवस साजरा केला. नाना आणि भारती यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा वाढदिवस साजरा.
( मराठी मालिकेचा चार्मिंग बॉय रंगभूमीवर, संदीप खरेच्या मुलीसोबत 'लागली पैज', VIDEO )
advertisement
भारती आचरेकर यांनी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये भारती आणि नाना यांच्यात झालेला गोड संवाद देखील लिहिला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय, "काल 4 नोव्हेंबर, आमच्या गुरु लाडक्या विजया बाईंचा 91 वा वाढदिवस होता. सकाळी सकाळी नानाचा फोन आला, मी बाईंकडे जातोय तू पण ये. माझं शूट दुपारी होत.. गुच्छ घेऊन गेले.. नानाने दादर मार्केट मधून खोली भरेल एवढी असंख्य प्रकारची फूल आणली होती. सबंध घरभर 20 एक फ्लॉवरपॉट मध्ये इतकी सुरेख लावली त्यातच मग्न होता तो. मी म्हटलं नान्या गणपतीची आठवण आली. तर म्हणाला अगं विजयाबाई आपला गणपतीच आहे. खूप कौतुक वाटल त्याचं. बाई पण खूप आनंदात होत्या."
विजया मेहता हे भारतीय मराठी सिनेसृष्टीतील काही दिग्गज नावांपैकी एक नाव आहे. मराठी सिनेमा आणि रंगभूमीवर विजया मेहता यांनी उल्लेखनीय काम केलं. अभिनेत्री होण्याबरोबरच त्या उत्कृष्ट दिग्दर्शिका आहेत. 'पार्टी', 'रावसाहेब', 'पेस्टनजी' सारख्या सिनेमांत त्यांनी केलेलं दिग्दर्शन उल्लेखनीय आहे. 1960 च्या दशकात त्यांनी प्रयोगशील मराठी रंगभूमीतील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व होत्या. मराठी सिनेमातील आताच्या अनेक ज्येष्ठ कलाकारांच्या त्या गुरू होत्या. नाना पाटेकर, भारती आचरेकर, नीना कुळकर्णी यांच्यासारखी अनेक कलाकार मंडळी त्यांच्या तालमीत तयार झाल्या. भारती आचरेकर यांच्या या पोस्टच्या निमित्तानं विजया मेहता अनेक वर्षांनी प्रेक्षकांसमोर आल्या.
