'चला हवा येऊ द्या' का सोडलं? निलेशनेच सांगितलं खरं कारण!
'लोकशाही'ला दिलेल्या एका खास मुलाखतीत निलेश साबळेने हे सिक्रेट सगळ्यांसोबत शेअर केलं. तो म्हणाला, " 'चला हवा येऊ द्या' च्या नव्या सीझनबद्दल माझं चॅनलशी बोलणं झालं होतं. आमची एक मीटिंगही झाली होती. पण सध्या मी एक मोठा सिनेमा दिग्दर्शित करतोय. तो खरंच बऱ्यापैकी मोठा सिनेमा आहे. त्यात खूप कलाकार आहेत. आपला लाडका भाऊ कदम सुद्धा त्या सिनेमात आहे. सिनेमाचं शूटिंग अजून दीड महिना चालेल. त्यामुळे तारखा जुळवणं खूपच अवघड झालं होतं."
advertisement
'गल्लीतला गुंड...', 'कालिया' म्हणत काढली लाज, लग्नाआधीच शत्रुघ्न सिन्हांच्या सासूने उतरवला माज
निलेश पुढे म्हणाला, "हा शो आता लगेच लाँच पण होतोय. त्यामुळे आमचं जुळलं नाही. शोचा आता नवीन वेगळा फॉरमॅटही होता, त्यासाठी खूप जास्त वेळ द्यावा लागणार होता. म्हणून आता आम्ही या पर्वात नाही आहोत."
भाऊ कदमसोबत आणखी कोण? निलेशच्या सिनेमात स्टार्सची अख्खी फौज!
निलेशने त्याच्या सिनेमाबद्दल आणखी काही गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. तो म्हणाला, "सिनेमात भाऊसोबत ओंकार पण आहे. तसंच आमच्या 'चला हवा येऊ द्या' टीमव्यतिरिक्तही दिग्गज कलाकारांची फौज आहे. साधारण डिसेंबर-जानेवारीपर्यंत सिनेमा रिलीज होईल. हे एक खूप मोठं प्रोजेक्ट आहे. त्यातून आम्हा सगळ्यांची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना बघायला मिळेल."
एवढंच नाही, तर निलेश साबळे आणखी एका नव्या प्रोजेक्टवर काम करत असल्याचंही त्याने सांगितलं. तो म्हणाला, "एका शोचीही तयारी करतोय. मात्र त्याबद्दल आता काहीच सांगता येणार नाही. तो एक भव्यदिव्य शो असणार आहे. त्याची लवकरच घोषणा होईल."
२०१४ ते २०२४ अशी दहा वर्षं 'चला हवा येऊ द्या'ने महाराष्ट्राला खळखळून हसवलं. यानंतर निलेश साबळे फारसा कुठे दिसला नाही. काही दिवसांपूर्वी एका ज्योतिषाने त्याच्यावर आरोप केले होते, तेव्हा तो चर्चेत आला. निलेशने व्हिडिओ शेअर करून त्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं होतं. आता मात्र तो एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये बिझी असल्याचं समोर आल्याने त्याच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल!