TRENDING:

निर्मिती सावंत VS ललित प्रभाकर, दोन फॅमिलीतील 'सुपर डुपर' राडा! या दिवशी होणार रिलीज, Teaser

Last Updated:

निर्मिती सावंत, ललित प्रभाकर यांची दोन कुटुंबं आणि धमाल गोंधळ पाहायला मिळणार आहे. सिनेमाचा धम्माल टीझर रिलीज झालाय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दोन कुटुंबं, एक गोंधळ आणि भरपूर धमाल घेऊन 'सुपर डुपर' हा सिनेमा प्रेक्षाकांच्या भेटीला येत आहे.  निर्मिती सावंत वर्सेस ललित प्रभाकर अशा या दोन कुटुंबातील धम्माल राडा सिनेमात पाहायला मिळणार आहे. सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. पोस्टरपासूनच या सिनेमाची चर्चा रंगली होती आणि आता या टीझरने त्या उत्सुकतेत आणखी भर घातली आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधील ही खास मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे. सिनेमात मोठी स्टारकास्ट देखील आहे. संपूर्ण फॅमिलीसोबत बसून हा सिनेमा तुम्ही पाहू शकता.
News18
News18
advertisement

टीझरमध्ये पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन भिन्न कुटुंबांची झलक पाहायला मिळते. एका बाजूला परंपरा जपणारे कुटुंब, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांची तरुण जोडी, दोघेही काहीतरी ‘प्लॅन’ आखताना दिसत आहेत. नेमका हा प्लॅन कशासाठी आहे? हा गोंधळ नेमका कशाचा आहे? या दोन विचारसरणींची टक्कर कोणत्या वळणावर जाऊन भिडणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच उलगडणार आहेत.

advertisement

( महाराष्ट्रात 'अहो' तसं साऊथमध्ये नवऱ्याला बायको काय म्हणते, रश्मिका विजयला कशी हाक मारते? )

एका घराच्या उंबरठ्यावर उभा राहिलेला हा संघर्ष केवळ दोन कुटुंबांची नसून दोन पिढ्यांचा, दोन विचारसरणींचा आणि दोन जीवनशैलींचा आहे, हे टीझरमधून दिसतेय. सिनेमात निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्यासह ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ‘सुपर डुपर’ हा खऱ्या अर्थाने मल्टिस्टारर ठरणार असून प्रत्येकाची वेगळी शैली आणि विनोदी टायमिंग पाहायला मिळणार आहे.

advertisement

पोस्टरनंतर आता टीझरनेही सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. हा सिनेमा येत्या 3 एप्रिलपासून थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील हा कौटुंबिक महासोहळा ठरणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
50 वर्षांच्या चवीची परंपरा,150 पदार्थांचे डेस्टिनेशन,पुण्यातील हे ठिकाण माहितीये
सर्व पहा

नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. विजय शिंदे आणि नरेश बोर्डे या चित्रपटाचे निर्माते असून उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर सादरकर्ते आहेत. तर छायांकन संजय जाधव यांनी केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
निर्मिती सावंत VS ललित प्रभाकर, दोन फॅमिलीतील 'सुपर डुपर' राडा! या दिवशी होणार रिलीज, Teaser
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल