नितीन देसाईंच्या अशा मृत्यूवर शोक व्यक्त करताना आमदार बालदी म्हणाले की, आपल्यातला एक मराठी दिग्दर्शक मोठ्या शिखरावर जातो आणि असा अंत होतो हे फार दुर्दैवी आहे. त्यांच्या आत्महत्येमागे आर्थिक कारण होतं. मागील काही दिवसांपासून स्टुडिओत शूटिंग होत नव्हतं, त्यामुळे आर्थिक चणचण होती. अनेकांशी डील केलं पण झालं नाही, म्हणूनच त्यांना हे पाऊल उचलावं लागलं असावं असं मला वाटतं.
advertisement
Nitin Chandrakant Desai Death : देशातलं पहिलं थीम पार्क, 43 एकरात पसरलेला भव्य ND स्टुडिओ
स्टुडिओ हा फिल्मवर चालतो. अनेक दिवसांपासून फिल्मचे शूटिंग होत नव्हते. काही मोठ्या कलाकारांशी वाद झाले होते, त्यामुळे कलाकारांनी तिथे न येण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चाही होत्या. दोन महिन्यांपूर्वी बोलणं झालं होतं तेव्हा नितीन देसाई काही चालत नाही, बऱ्याच लोकांशी बोलतोय पण कुणी यायला तयार नाही असं तो सांगायचा असंही आमदार बालदी यांनी सांगितले.
