सुपरहिट प्रेमकथा सादर करणारे प्रख्यात दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा 'प्रेमाची गोष्ट' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला होता. या चित्रपटातील ‘ओल्या साजं वेळी’ हे गाणं अत्यंत लोकप्रिय झालं. संगीतप्रेमींच्या ओठांवर गुणगुणलं जाणारं हे गाणं आजही प्रेक्षकांच्या आठवणीत ताजं आहे. आता 'प्रेमाची गोष्ट 2' या बहुप्रतीक्षित सिक्वेलमधून हेच गाणं एका नव्या प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
advertisement
( Lalit Prabhakar : ललित प्रभाकरने सांगितलं लग्न न करण्याचं कारण; म्हणाला,"मेरी दुल्हन तो..." )
ओल्या सांजवेळी या गाण्यात ललित प्रभाकर आणि रुचा वैद्य यांच्या मनमोहक केमिस्ट्रीची पाहायला मिळत आहे. दोघांच्या रोमँटिक अंदाजात पुन्हा एकदा हे सुंदर गाणं अनोख्या स्वरूपात अनुभवायला मिळेल. 'ओल्या साजंवेळी' हे गाणं काविर आणि बेला शेंडे यांनी गायलं आहे. अश्विनी शेंडे आणि विश्वजीत जोशी यांनी गाणं लिहिलं असून अविनाश-विश्वजीत यांचं कमाल संगीत गाण्याला मिळालं आहे.
संगीतकार अविनाश-विश्वजीत म्हणतात, "चित्रपटाच्या पहिल्या भागातील 'ओल्या साजंवेळी' गाण्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. यावेळी आम्हाला त्या गाण्याची तीच भावना आणि गोडवा टिकवून काहीतरी वेगळं, नवं प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न होता. त्यात नव्या पिढीला भावेल असा ताजेपणा आणि तरुणाईचा स्पर्श दिला आहे."
प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमात भाऊ कदम, स्वप्नील जोशी, ललित प्रभाकर, ऋचा वैद्य व रिधिमा पंडित हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. प्रेम आणि नशीबाचा हा जादुई प्रवास पहायला मिळणार आहे. येत्या 22 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.