TRENDING:

इरिनाच्या वाढदिवशी वैभवने मनातलं सांगितलंच, VIDEO शेअर करत म्हणाला, "तू माझ्या आयुष्यात..."

Last Updated:

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात परदेसी गर्ल इरिना रुवाकोडा आणि अभिनेता वैभव चव्हाण यांची केमिस्ट्री दिसली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व चांगलंच गाजलं. घरात पहिल्या दिवसापासून एक कपल ते म्हणजे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल. घरात दोघांच्या प्रेमाचे वारे वाहू लागले. एकीकडे निक्की आणि अरबाज तर दुसरीकडे आणखी एक लव्ह स्टोरी सुरू होतेय की काय असंही लोकांना वाटलं. हे जोडपं होतं वैभव आणि इरिनाचं.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात परदेसी गर्ल इरिना रुवाकोडा आणि अभिनेता वैभव चव्हाण यांची केमिस्ट्री दिसली.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात परदेसी गर्ल इरिना रुवाकोडा आणि अभिनेता वैभव चव्हाण यांची केमिस्ट्री दिसली.
advertisement

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात परदेसी गर्ल इरिना रुवाकोडा आणि अभिनेता वैभव चव्हाण यांची केमिस्ट्री दिसली. अनेकदा इरिना वैभवच्या बोलण्यावर लाजताना आणि वैभव वारंवार तिचं कौतुक करताना दिसला आहे. ते दोघेही कायम एकत्र खेळताना आणि एकमेकांची साथ देताना दिसले. त्यांच्याच प्रेमाचं वारं वाहतंय असं अनेकदा म्हटलं गेलं. पण त्यांनी प्रत्येकवेळी हे मैत्रीचं नातं असल्याचं ठणकावून सांगितलं.

advertisement

Viral Kohli : ऑस्ट्रेलिया दौरा फ्लॉप, प्रेमानंद महाराजांच्या चरणाशी विराट कोहली, प्रवचन ऐकून अनुष्काच्या चेहऱ्यावर स्मितहास्य 

दरम्यान, बिग बॉसच्या घरात तयार झालेली नाती या घराबाहेर टिकत नाहीत असं वेळोवेळी दिसून आलं आहे. मात्र वैभव आणि इरिनाची मैत्री याला अपवाद ठरल्याचं दिसतंय. त्यांची मैत्री अजूनही कायम आहे. आज इरिनाचा वाढदिवस आहे. या निमित्ताने वैभवने खास व्हिडीओ पोस्ट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इतकंच नाही, तर त्याने इरिनासाठी सुंदर संदेशही लिहिला आहे.

advertisement

वैभवने त्याच्या इन्स्टा पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ''सर्वांत सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू एक शुद्ध आत्मा आहेस आणि काहीही झाले तरीही तू प्रत्येकाला प्रेरणा देत असते. तुझ्यासारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्याचा मला आनंद आहे. आणि हो कधीकधी तू वेडीही असतेस. मी तुम्हाला इतके मजबूत आणि स्वतंत्र पाहिले आहे की मला तुझ्याकडून नेहमीच प्रेरणा मिळत आली आहे. मी आशा करतो की तू अशीच प्रगती करत राहशील आणि अधिकाधिक वाढत चमकत राहशील. देव तुला सर्व सुख आणि यश देवो. तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.''

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
इरिनाच्या वाढदिवशी वैभवने मनातलं सांगितलंच, VIDEO शेअर करत म्हणाला, "तू माझ्या आयुष्यात..."
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल