अशातच Amazon Prime Video वर एक तेलुगू थ्रिलर सध्या जबरदस्त ट्रेंडिंग आहे. या चित्रपटाचं नाव आहे 'द 100'. प्रदर्शित होताच त्याने प्रेक्षकांची झोप उडवली आहे. सस्पेन्स इतका भन्नाट आहे की अनेकांनी म्हटलं "हा पाहिल्यावर विजय सेतुपतीचा ‘महाराजा’ही फिका वाटतो!"
बॉलिवूडचा महाफ्लॉप सिनेमा; 5 वर्षांची मेहनत, 210 कोटींचं बजेट, सगळं गेलं पाण्यात
advertisement
काय आहे कथेत?
कथा सुरू होते एका तरुणीच्या आत्महत्येने. तिचं प्रियकराशी भांडण होतं आणि ती आयुष्य संपवते. तिचा प्रियकर हॅकर असतो. त्याचवेळी पोलिस खात्यातील एक प्रामाणिक आणि एन्काउंटरविरोधी IPS विक्रांत (मुख्य भूमिका) याला हैदराबादच्या बाहेर झालेल्या चोऱ्या आणि खुनांच्या तपासाची जबाबदारी दिली जाते.
सुरुवातीला कथा सोपी वाटते, पण जसजसा तपास पुढे सरकतो, तसतसे धक्के बसायला लागतात. विक्रांतला या केसदरम्यान भेटते आरती एक धाडसी, स्पष्टवक्ता आणि रहस्यमय व्यक्ती. तिच्या जीवनात इतकी वळणं आहेत की विक्रांतच्या तपासाला अजूनच गुंतागुंतीचं रूप मिळतं.
क्लायमॅक्समध्ये जे उलगडतं, ते प्रेक्षकांना अक्षरशः श्वास रोखायला लावणारं आहे. भन्नाट ट्विस्ट्स आणि प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा क्लायमॅक्स. दिग्दर्शक राघव ओंकार यांनी प्रत्येक सीनमध्ये सस्पेन्सला ताणून धरलंय. जर तुम्हाला ‘क्राईम-थ्रिलर’ प्रकारचे चित्रपट आवडत असतील, तर ‘द 100’ नक्कीच तुमच्यासाठी आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहता, हा चित्रपट 2025 मधील ओटीटीवरील मस्ट वॉच लिस्टमध्ये अगदी वरच्या क्रमांकावर आहे.