TRENDING:

'स्वराज्यरक्षक संभाजी'नंतर प्राजक्ता गायकवाडचा नवा ऐतिहासिक सिनेमा, पहिलं पोस्टर लाँच

Last Updated:

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्तानं प्राजक्ताच्या नव्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 07 ऑक्टोबर : टेलिव्हिजनवर मधल्या काळात अनेक ऐतिहासिक मालिका प्रेक्षकांच्या भेटील आल्या. आताही काही मालिका सुरू आहेत. यातील फार कमी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या. यातील एक मालिका म्हणजे 'स्वराज्यरक्षक संभाजी'. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मालिकेतील प्रत्येक पात्र हिट झाली. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेले छत्रपती संभाजी महाराज असोत, शंतनु मोघेंही साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा संभाजी महाराजांच्या पत्नीची भुमिका साकारलेल्या येसूबाई म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड असो. सगळ्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला येसूबाईंच्या भुमिकेमुळे प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेनंतर प्राजक्ता आता आणखी एका ऐतिहासिक कलाकृतीमध्ये दिसणार आहे.
प्राजक्ता गायकवाड
प्राजक्ता गायकवाड
advertisement

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्तानं प्राजक्ताच्या नव्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. 'वीर मुरारबाजी' असं तिच्या नव्या सिनेमाचं नाव असून हा एक ऐतिहासिक सिनेमा आहे. पुरंदरची युद्धगाथा सिनेमातून दाखवण्यात येणार आहे. प्राजक्ता या सिनेमात नेमकी कोणती भुमिका साकारणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

advertisement

हेही वाचा - 'माझ्या गळ्यात हार अन् फेटा घालून ते निघून गेले', प्रसाद ओकबरोबर नेमकं काय घडलं?

प्राजक्तानं शेअर केलेल्या वीर मुरारबाजी या सिनेमाच्या पोस्टरमध्ये ती नऊवारी साडीत दिसतेय. डोक्यावर पदर, नाकात नथ, हातात लाला बांगड्या, कपाळी चंद्रकोर असा तिचा अस्सल मराठमोळा पेहराव दिसत आहे. तिच्या हातात विठ्ठल-रखुमाईची मूर्ती असून ती त्या मूर्तीकडे पाहताना दिसत आहे. "आज वाढदिवसाच्या निमित्ताने खास प्रेक्षकांसाठी पोस्टर प्रदर्शित", म्हणत प्राजक्तानं चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे. प्राजक्ताच्या या नव्या सिनेमासाठी तिच्या चाहत्यांनी उत्सुकता दाखवली आहे.

advertisement

प्राजक्ताच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं झालं तर, 'नांदा सौख्यभरे' ही प्राजक्ताची पहिली मालिका. यात तिनं सहअभिनेत्रीची भुमिका साकारली होती. त्यानंतर 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतून तिला मोठा ब्रेक मिळाला. संभाजी मालिकेनंतर प्राजक्ता 'आई माझी काळूबाई' या मालिकेत दिसली. पण तिनं ती मालिका अर्ध्यातच सोडली. प्राजक्ताचे काही आगामी प्रोजेक्ट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
'स्वराज्यरक्षक संभाजी'नंतर प्राजक्ता गायकवाडचा नवा ऐतिहासिक सिनेमा, पहिलं पोस्टर लाँच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल