प्राजक्ता माळीने पुण्यातील येरवडा महिला कारागृहातील महिलांना भेट दिली. या भेटीचा आनंद तिने या व्हिडीओमधून शेअर केला आहे. तिने श्री श्री रविशंकरजी यांच्या शिकवणीचा उपयोग करत कारागृहातील महिलांचं ध्यान साधना सत्र घेतलं.
'पुरूषासारखे मसल्स' म्हणत मृणालने उडवली खिल्ली, Video व्हायरल होताच बिपाशा संतापली
व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने लिहिलं, सदिच्छा भेट..! पुणे - महिला कारागृह सुधारणा, पुनर्वसन. सेवेचा सर्वोत्तम प्रकार म्हणजे कोणाचीतरी मनःस्थिती उंचावणे. श्री श्री रविशंकरजी, मीही माझ्या लहानशा क्षमतेत तेच करण्याचा प्रयत्न करत एक छोटसं ध्यान सत्र घेतलं. गुरुदेव म्हणतात, आपल्याला कधी कधी रुग्णालये, कारागृह, शेती या ठिकाणी जावं, ज्यामुळे आपल्याला आठवते की आपले आयुष्य किती कृतज्ञतेने भरलेले आहे. अतिशय खरे. संधी दिल्याबद्दल ‘माहेर महिलागृहा’चे आभार.”
advertisement
दरम्यान, प्राजक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर भरपूर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव पहायला मिळत आहे.