Bipasha Basu-Mrunal Thakur: 'पुरूषासारखे मसल्स' म्हणत मृणालने उडवली खिल्ली, Video व्हायरल होताच बिपाशा संतापली

Last Updated:

Bipasha Basu-Mrunal Thakur: टीव्हीवरून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणारी मृणाल ठाकूर सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. कारण तिने बिपाशा बसुच्या शरिराची खिल्ली उडवली.

मृणालने बिपाशा बसूच्या शरीराची खिल्ली उडवली
मृणालने बिपाशा बसूच्या शरीराची खिल्ली उडवली
मुंबई : टीव्हीवरून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणारी मृणाल ठाकूर सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. कारण, तिचा जुना व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मृणालने बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूची थट्टा केली होती. तिने बिपाशाला "मर्दाना" म्हणत तिच्या शरीराची खिल्ली उडवली होती. व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यामुळे आता बिपाशाने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
मृणालचा जुना व्हिडीओ समोर आल्यानंतर बिपाशानेही शांत बसण्याचा पर्याय निवडला नाही. तिने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट टाकत अप्रत्यक्षपणे मृणालला उत्तर दिले. बिपाशाने लिहिले, "मजबूत महिला एकमेकींना उंचावतात. सुंदर महिलांनो, मसल्स तयार करा. मजबूत राहणं गरजेचं आहे. मसल्स तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. महिलांनी मजबूत दिसू नये हा जुनाट विचार सोडून द्या. स्वतःवर प्रेम करा."
advertisement
या विधानामुळे मृणालवर जोरदार ट्रोलिंग सुरू झाले आहे. अनेकांनी तिला महिलांविषयी चुकीची मानसिकता ठेवण्याचा आरोप केला. काहींनी तिच्या स्वतःच्या फिटनेसवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
bipasha basu
bipasha basu
advertisement
बिपाशाविषयी मृणाल ठाकूर काय म्हणाली होती?
हा व्हिडिओ तिच्या ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेतील दिवसांमधील आहे.मुलाखतीत, मृणालच्या सहकलाकाराने (अरिजीत तनेजा) त्याला कोणत्या प्रकारची मुलगी लग्नासाठी हवी आहे, याबद्दल बोलताना बिपाशा बसूचे नाव घेतले. त्यावर मृणालने त्याला काही प्रश्न विचारले आणि म्हटले, "जा बिपाशाशी लग्न कर. तुला अशा मुलीशी लग्न करायचे आहे का जिचे पुरुषांसारखे मसल्स आहेत? ऐक, मी बिपाशापेक्षा खूप चांगली आहे."
advertisement
advertisement
दरम्यान, आता, बिपाशासोबतच्या या वादामुळे मृणाल पुन्हा एकदा चर्चेच्या भोवऱ्यात सापडली आहे, आणि नेटिझन्स तिच्या जुन्या वक्तव्यावरून तिला चांगलंच धारेवर धरत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bipasha Basu-Mrunal Thakur: 'पुरूषासारखे मसल्स' म्हणत मृणालने उडवली खिल्ली, Video व्हायरल होताच बिपाशा संतापली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement