Sunidhi Chauhan: 18 व्या वर्षी लग्न, कुटुंबाच्या विरोधात जाऊन थाटला संसार; पण वर्षभरातच मोडला

Last Updated:
Sunidhi Chauhan: लोकप्रिय गायिका सुनिधी चौहानने तिच्या मेहनतीने हिंदी संगीतसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.18 वर्षांची असताना घरच्यांच्या विरोधाला न जुमानता तिने लग्नाचा निर्णय घेतला होता.
1/7
लोकप्रिय गायिका सुनिधी चौहानने तिच्या मेहनतीने हिंदी संगीतसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. “शीला की जवानी”, “कमली”, “मेरे हाथ में” यांसारखी असंख्य हिट गाणी गाऊन तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली.

advertisement
2/7
पण जसे तिचे करिअर चमकत गेले, तसे तिच्या वैयक्तिक आयुष्यात वादळेही आली.सुनिधी केवळ 18 वर्षांची असताना, घरच्यांच्या विरोधाला न जुमानता तिने लग्नाचा निर्णय घेतला. 2002 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी कोरिओग्राफर बॉबी खानशी लग्न केलं.

3/7
सुनिधीच्या या लग्नाला घरच्यांची संमती नव्हती कारण तिचा पती मुस्लिम धर्माचा होता आणि दोघांमध्ये तब्बल 14 वर्षांचे वयाचे अंतर होते. या कारणांमुळे सुनिधीने कुटुंबाशी असलेले सर्व संबंध तोडले.

4/7
सुरुवातीच्या काही महिन्यांपर्यंत तिचे संसारजीवन ठीकठाक चालले. पण हळूहळू मतभेद वाढू लागले. करिअरच्या वाढत्या जबाबदाऱ्या, व्यस्त शेड्युल आणि वैचारिक फरक यामुळे नात्यात दुरावा आला. तणाव इतका वाढला की वर्षभरात दोघांचे नाते तुटले.

5/7
या काळात सुनिधीने खूप मानसिक ताण सहन केला. एका मुलाखतीत तिने कबूल केले की ती त्या काळात स्वतःला एकटी समजू लागली होती. मात्र, तिने हार मानली नाही. संगीत हेच तिच्यासाठी थेरपी ठरले. ती पुन्हा स्टेजवर परतली आणि चाहत्यांच्या प्रेमाने तिने आपली उर्जा परत मिळवली. त्यानंतर 2012 मध्ये सुनिधी चौहानने संगीतकार हितेश सोनिक यांच्याशी लग्न केले. त्यांना तेग नावाचा एक मुलगा आहे.

6/7
सुनिधी चौहान तिच्या दमदार आवाजासाठी आणि गाण्याच्या अष्टपैलुत्वासाठी ती ओळखली जाते. तिने हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत.

7/7
सुनिधीने अगदी लहान वयातच गाणे सुरू केले. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी 'एकलव्य' या संगीत रिॲलिटी शोमध्ये तिने भाग घेतला आणि ती या शोची विजेती ठरली. 1999 मध्ये आलेल्या 'मस्त' या चित्रपटातील
सुनिधीने अगदी लहान वयातच गाणे सुरू केले. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी 'एकलव्य' या संगीत रिॲलिटी शोमध्ये तिने भाग घेतला आणि ती या शोची विजेती ठरली. 1999 मध्ये आलेल्या 'मस्त' या चित्रपटातील "रुकी रुकी" हे गाणे तिच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरले. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. "शीला की जवानी", "कमली", "बीड़ी जलैले", "इश्क सूफियाना" आणि "धूम मचाले" यांसारखी तिची अनेक गाणी प्रचंड हिट झाली आहेत.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement