प्रिया बापटचा जन्म दादरचा आहे. दादरमध्ये तिचं बालपण गेलं. दादरच्या घरात प्रियाबरोबर हॉरर सीन घडला होता. Divay Agarwalला दिलेल्या मुलाखतीत प्रिया म्हणाली, "मी बॉर्न अँड बॉटम दादरची आहे. माझ्या आई-वडिलांचं घर दादरमध्ये आहे. तिथे मला एकदा असं फिल झालं की कोणतरी खिडकीमधून आलं आहे. ते फक्त पाहत होते, त्यांनी कोणाला काही केलं नाही."
advertisement
प्रिया पुढे म्हणाली, "मला घुंगरांचे आवाज ऐकू आले छन छन छन. मला त्याच्या पाऊलांचा आवाज ऐकू येत होता. मी खूप घाबरट आहे. खूप फट्टू आहे, घाबरून मी काही करू शकते. पण त्यावेळी मला अजिबात भिती वाटली नाही. मी खूप शांत होते. मी माझे डोळेही उघडले नाही. माझे डोळे बंद होते पण कोणीतरी खिडकीतून माझ्या घरात शिरलं आहे हे मला पूर्णपणे फिल होत होतं."
"छन छन छन असा आवाज करत ते माझ्या आई-वडिलांच्या रुमच्या दिशेने गेले. तो आवाज माझ्या जवळून पास होतोय हे मला फिल होत होतं. तो गेला आणि तिथे सेटल झाला. थोड्या वेळाने मला पुन्हा आवाज आला. मग पुन्हा सगळं शांत झालं. हे मध्यरात्री 3-4 वाजताच्या दरम्यान घडलं", असंही प्रियानं सांगितलं.
प्रियानं दुसऱ्या दिवशी हे तिच्या पालकांना सांगितलं. ती म्हणाली, "ही घटना घडल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या आई-बाबांना सांगितलं. त्यांचा माझ्यावर विश्वास बसला नाही. मी जेव्हा त्यांना हे सांगितलं, तेव्हा माझे बाबाही म्हणाले की, मलाही सेम फिल झालं आणि असं वाटलं की कोणतरी येऊन माझ्या बाजूला बसलं आहे. नंतर तो उठून निघून गेला."
"अनेकदा असं म्हणतात की, वास्तुपुरूष असतात. कोकणात हे फार बोललं जातं. ते खूप चांगले आत्मे असतात. तुम्ही सुरक्षित आहात ना हे पाहण्यासाठी ते येतात. ज्यांचा अध्यामावर विश्वास आहे किंवा मोठ्या शक्तींवर विश्वास आहे त्यांना असे अनुभव अनेकदा येतात", असंही प्रिया म्हणाली.
