वैष्णवी हगवणे प्रकरणावर आता मराठी अभिनेता पुष्कर जोगने आक्रोश व्यक्त केला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर एक संतप्त पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या लक्षवेधी ठरत आहे.
पुष्कर जोग पोस्ट
"खूप लाज वाटते... जे काही महाराष्ट्रामध्ये घडतंय... आधी स्वारगेट प्रकरण, आता वैष्णवी... आपल्या भगिनी सुरक्षित आहेत का? एका मुलीचा बाप म्हणून भीती वाटते आता. आता गप्प बसून चालणार नाही. माणुसकी आणि समाजातील निरागस भगिनींचा प्रश्न आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्या."
advertisement
पुष्करने "Justice For Vaishnavi" अशी मागणी करत एक जबाबदार नागरिक आणि वडिलांच्या नजरेतून आपली भावना व्यक्त केली.
pushkar jog Post on Vaishnavi case
दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये तिच्या शरीरावर गंभीर जखमा आढळल्या. पोलिसांनी सांगितलं की, तिच्यावर वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण करण्यात आली होती. तिच्या लग्नात 51 तोळे सोनं, एक महागडी कार (फॉर्च्युनर), आणि इतर महागड्या भेटवस्तू दिल्या गेल्या होत्या. तरीही पैशांसाठी तिला त्रास देण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक केली आहे. अनेक दिवस ते फरार होते, पण शेवटी विशेष पथकांच्या साहाय्याने त्यांना पकडण्यात आलं.