Vaishnavi Hagawane: तोंडावर थुंकणं, मारहाण, छळ; वैष्णवी प्रकरणावर किरण माने संतप्त, म्हणाले, 'महाराष्ट्र नराधमांच्या ताब्यात...'
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Vaishnavi Hagawane: वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्र धक्क्यात आहे. वैष्णवीसोबत झालेल्या छळामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली आहे.
मुंबई : वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्र धक्क्यात आहे. वैष्णवीसोबत झालेल्या छळामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. आता या प्रकरणावर अनेक कलाकारांनीही संताप व्यक्त केलाय. अभिनेता किरण माने यांनी या प्रकरणी फेसबुक पोस्ट शेअर करत तीव्र संताप व्यक्त केलाय.
वैष्णवी हगवणे हिला हुंड्यासाठी सतत मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागत होता. तिला मारहाण केली जात होती, तोंडावर थुंकण्यात येत होतं, असा आरोप आहे. इतकंच नव्हे, मोठ्या सुनेने तिच्यावरही झालेल्या लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या प्रकरणावर आता किरण माने यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
advertisement
किरण मानेची पोस्ट
हा महाराष्ट्र इतिहासातल्या सगळ्यात नीच नराधम्यांच्या मगरमिठीत सापडला आहे. हे आता होत रहाणार. गुन्हेगारांच्या राज्यात गुन्हेगाराला कधी शिक्षा होते का? संतोष देशमुख प्रकरणात राजीनामा दिलेल्या मंत्र्यांच्या पुनर्वसनाची निर्लज्ज बातमी आजच तुमच्या चॅनलवर पाहिली.
वाईट याचे वाटते की, वैष्णवी नावाच्या एका भगिनीचा हुंड्यासाठी अतोनात छळ झालाय. मारहाणीपासून ते तोंडावर थुंकण्यापर्यंतचे प्रकार झालेत. बिचारीनं टोकाचं पाऊल उचललं. हे सगळं करणारा जरी सत्ताधारी पक्षातला पदाधिकारी असला, तरी त्याच्यावर यापूर्वी आधीच्या सुनेनं लैंगिक छळाचाही आरोप केलेला आहे.
advertisement
एक 'महिला' म्हणूनही याबद्दल संवेदना न वाटता, त्यांना स्वतःचा इगो महत्त्वाचा वाटला. अंबरनाथची चिमुरडी...संतोष देशमुख... सोमनाथ सुर्यवंशी... यांच्याप्रमाणेच वैष्णवीलाही न्याय मिळण्याची शक्यता शून्य आहे. कारण सगळ्या प्रकरणांचे लागेबांधे सत्तेपर्यंत जातात. तात्पुरती गरमागरमी होणार... कारवाया होणार... खूपच गरज वाटली तर खोट्या एनकाऊंटरसारखी हवाबाजी होणार... नंतर खरे आरोपी खुलेआम फिरणार.
इतिहासातल्या सगळ्यात किळसवाण्या नराधम्यांना महाराष्ट्राच्या छाताडावर नंगानाच करताना बघा... पर्याय नाही. किरण मानेची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टवर अनेकांच्या कमेंट पाहायला मिळत आहेत. लोकांनी किरण मानेच्या मताशी सहमत असल्याचं सांगितलं.
advertisement
दरम्यान, 23 वर्षीय वैष्णवीने 16 मे 2025 रोजी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, सासरच्या मंडळींनी तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केला. लग्नाच्या वेळी 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी आणि इतर महागड्या वस्तू देण्यात आल्या होत्या. तरीही हगवणे कुटुंबाने 2 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली होती. या मागण्यांमुळे वैष्णवीवर सतत दबाव टाकण्यात आला, ज्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 23, 2025 1:23 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Vaishnavi Hagawane: तोंडावर थुंकणं, मारहाण, छळ; वैष्णवी प्रकरणावर किरण माने संतप्त, म्हणाले, 'महाराष्ट्र नराधमांच्या ताब्यात...'