Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या छळावर संतापला हेमंत ढोमे, संतापून म्हणाला, 'आईबापाची ...'

Last Updated:

Vaishnavi Hagawane Death Case: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. या प्रकरणात हुंड्यासाठी छळ, कौटुंबिक हिंसाचार आणि राजकीय हस्तक्षेप यांचे गंभीर आरोप समोर आले आहेत.

वैष्णवीच्या छळावर संतापला हेमंत ढोमे
वैष्णवीच्या छळावर संतापला हेमंत ढोमे
पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. या प्रकरणात हुंड्यासाठी छळ, कौटुंबिक हिंसाचार आणि राजकीय हस्तक्षेप यांचे गंभीर आरोप समोर आले आहेत. वैष्णवीसोबत झालेल्या छळामुळे संपूर्ण महाराष्ट संतापला आहे. आता या प्रकरणावर हेमत ढोमेने संतप्त पोस्ट शेअर केली आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणावर हेमंत ढोमे पोस्ट
वैष्णवी हगवणे प्रकरणावर विविध प्रतिक्रिया आणि संताप समोर येत असतात आता मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने याविषयी पोस्ट शेअर केली. हेमंत पोस्टमध्ये म्हणाला, 'वैष्णवी कस्पटे (मुळ नाव) आणि तेच वापरावं! ज्या आडनावाने तिचा बळी घेतला ते नकोच! या आपल्या बहिणीचा आजच्या काळात हुंडाबळी गेलाय! गेली अनेक वर्ष तिचा छळ झालांय… चूक दोन्ही बाजूची आहे… सासरकडच्यांची आणि हुंडा देणाऱ्या आईबापाची सुद्धा! लवकरात लवकर कठीण कारवाई झाली पाहिजे आणि यापुढे आपल्या महाराष्ट्रात तरी अशा घटना होऊ नयेत म्हणून आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे…'.
advertisement
23 वर्षीय वैष्णवीने 16 मे 2025 रोजी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, सासरच्या मंडळींनी तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केला. लग्नाच्या वेळी 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी आणि इतर महागड्या वस्तू देण्यात आल्या होत्या. तरीही हगवणे कुटुंबाने 2 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली होती. या मागण्यांमुळे वैष्णवीवर सतत दबाव टाकण्यात आला, ज्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती.
advertisement
advertisement
दरम्यान, वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत. यामुळे तिच्या मृत्यूबाबत आत्महत्या की हत्या याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या छळावर संतापला हेमंत ढोमे, संतापून म्हणाला, 'आईबापाची ...'
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement