ENG vs SA : इंग्लंडने इतिहास रचला! T20 सामन्यात ठोकले तब्बल 304 रन, भारताचा रेकॉर्ड उद्धवस्त, पाहा Highlights

Last Updated:

England Vs South Africa : इंग्लंडच्या बॅटर्सनी केवळ 20 ओव्हर्समध्ये 2 बाद 304 धावांचा डोंगर उभा केला. फिलिप सॉल्टने 60 बॉलमध्ये नाबाद 141 धावांची रेकॉर्ड ब्रेक इनिंग खेळली.

England makes history Highest runs Score in T20I
England makes history Highest runs Score in T20I
England Vs South Africa Highlights : वनडे क्रिकेटमध्ये 300 रन्स करणं अवघड असतंय. पण टी-ट्वेंटीमध्ये कधी 300 रन्स होताना पाहिलेत का? होय असं घडलंय. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 इंटरनॅशनल मॅचमध्ये इंग्लंडने अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड मोडीत काढला आहे. हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखालील संघ टी-20 मध्ये 300 धावांचा टप्पा ओलांडणारा जगातला पहिला देश ठरला आहे.

20 ओव्हर्समध्ये 304 धावांचा डोंगर

या मॅचमध्ये टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या एडन मार्करम यांना त्यांच्या निर्णयाचा नक्कीच पश्चात्ताप झाला असेल. कारण, इंग्लंडच्या बॅटर्सनी केवळ 20 ओव्हर्समध्ये 2 बाद 304 धावांचा डोंगर उभा केला. फिलिप सॉल्टने 60 बॉलमध्ये नाबाद 141 धावांची रेकॉर्ड ब्रेक इनिंग खेळली. यामध्ये त्याने 15 फोर आणि 8 सिक्स ठोकले. त्याला जोस बटलरची चांगली साथ मिळाली. बटलरने 30 बॉलमध्ये 8 फोर आणि 7 सिक्सच्या मदतीने 83 धावांची आक्रमक खेळी केली.
advertisement
टीम इंडियाचा रेकॉर्ड मोडीत
तर कर्णधार हॅरी ब्रूकनेही नाबाद राहत 21 बॉलमध्ये 41 धावा केल्या. फिलिप सॉल्टने 39 बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले. हे इंग्लंडच्या कोणत्याही बॅटरने केलेले सर्वात जलद शतक आहे. हे त्याच्या टी-20 इंटरनॅशनल कारकिर्दीतील चौथे शतक देखील आहे. टी-20 इंटरनॅशनलमध्ये टीमच्या एकूण धावसंख्येच्या बाबतीत इंग्लंडने भारताचा रेकॉर्ड मोडला आहे. 12 ऑक्टोबर 2024 रोजी बांगलादेशविरुद्ध हैदराबादमध्ये भारताने 6 विकेट्सवर 297 धावा केल्या होत्या.
advertisement

पाहा मॅचची हायलाईट्स

तिसरी सर्वात मोठी धावसंख्या

दरम्यान, टी-20 इंटरनॅशनलमध्ये ही एकूण तिसरी सर्वात मोठी धावसंख्या आहे. 23 ऑक्टोबर 2024 रोजी झिम्बाब्वेने गांबियाविरुद्ध 4 विकेट्सवर 344 धावा केल्या होत्या पण असे स्कोर क्रिकेटतज्ज्ञ मापात धरत नाहीत. तर 27 सप्टेंबर 2023 रोजी नेपाळने मंगोलियाविरुद्ध 3 विकेट्सवर 314 धावांचा विशाल स्कोर उभा केला होता.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ENG vs SA : इंग्लंडने इतिहास रचला! T20 सामन्यात ठोकले तब्बल 304 रन, भारताचा रेकॉर्ड उद्धवस्त, पाहा Highlights
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement