Shah Rukh Khan : ब्लॉकबस्टर सिनेमांचा 'किंग', पण 'त्या' सिनेमावेळी ढसाढसा रडला होता शाहरुख, असं घडलं काय?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Shah Rukh Khan : शाहरुख खानने आपल्या करिअरमध्ये 100 पेक्षा जास्त चित्रपट दिले आहेत. त्याचे अनेक चित्रपट हिट झाले, तर काही अपयशी ठरले. पण तुम्हाला माहिती आहे का? शाहरुख खान एक चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे खूप रडला होता.
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि जूही चावला (Juhi Chawla) यांच्या "फिर भी दिल है हिंदुस्तानी" या चित्रपटाला 25 वर्षं पूर्ण झाली आहेत. अजीज मिर्झा यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा चित्रपट कमी पडला. किंग खानलाही या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. पण प्रेक्षकांच्या पसंतीस मात्र हा चित्रपट उतरला नाही. त्यामुळे शाहरुखला खूप वाईट वाटलं होतं. या फ्लॉप चित्रपटामुळे शाहरुखला अश्रू अनावर झाले होते. विशेष म्हणजे शाहरुख खान, जहू चावला आणि अजीज मिर्झा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती.
'फिर भी दिल है हिंदुस्तानी' हा चित्रपटाची ड्रीम्ज अनलिमिटेड (Dreamz Unlimited) या निर्मितीसंस्थेच्या बॅनरअंतर्गत निर्मिती करण्यात आली होती. शाहरुखने जूही चावला आणि दिग्दर्शक अजीज मिर्झा यांच्यासोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली होती. पुढे या प्रोडक्शन हाउसचं नाव बदलून रेड चिलीज एंटरटेनमेंट (Red Chillies Entertainment) करण्यात आलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाहरुखच्या प्रोडक्शनचा पहिलाच चित्रपट म्हणजे "फिर भी दिल है हिंदुस्तानी" हा आहे. त्यामुळे शाहरुखसाठी हा चित्रपट खूप खास होता. पण दुर्दैवाने प्रेक्षकांना हा चित्रपट अजिबातच आवडला नाही. हा चित्रपट सुमारे 13 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 10 कोटी रुपयांची कमाई केली. हा चित्रपट फ्लॉप झाल्याचं शाहरुखला खूप दु:ख झालं होतं.
advertisement
शाहरुख खानने आपल्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तो आपल्या फ्लॉप चित्रपटांमधून नेहमी काही ना काही शिकतो आणि कधीही त्याचा पश्चात्ताप करत नाही. पण "फिर भी दिल है हिंदुस्तानी" या चित्रपटाचं वाईट प्रदर्शन पाहून शाहरुख आणि जूही चावला खूप रडले होते. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अजिबातच चालला नव्हता. त्यामुळे शाहरुख खूप दुःखी झाला होता.
advertisement
"फिर भी दिल है हिंदुस्तानी" हा चित्रपट मीडिया आणि रिपोर्टर्स यांच्या आयुष्यावर आधारित होता. या चित्रपटात शाहरुख खानने अजय बक्षी ही भूमिका साकारली होती. तर जूही चावला रिया बॅनर्जीच्या भूमिकेत होती. सिनेमाच्या कथेत अजय आणि रिया एकमेकांसोबत स्पर्धा करताना दिसून आल्या होत्या. जेव्हा एका वडिलांचा, आपल्या मुलीवर झालेल्या बलात्काराचा बदला घेण्यासाठी, ते एक बिझनेसमनला ठार मारतात तेव्हा सिनेमात खऱ्या अर्थाने ट्विस्ट येतो. त्यानंतर अजय आणि रिया मिळून त्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी केस लढतात आणि विजय मिळवतात.
advertisement
चित्रपटातील सर्व गाणी जावेद अख्तर यांनी लिहिली होती आणि संगीत आदेश श्रीवास्तव यांचं होतं. या चित्रपटाने आपल्या ओपनिंग डेला भारतीय बॉक्स ऑफिसवर केवळ 91 लाखांची कमाई केली होती. तर पहिल्या आठवड्यातील या चित्रपटाचं कलेक्शन फक्त 5.8 कोटी रुपये इतकंच होतं. या चित्रपटात शाहरुख खान, जूही चावला यांच्यासोबत परेश रावल, जॉनी लीवर, संजय मिश्रा, शरत सक्सेना, अंजन श्रीवास्तव, दलीप ताहिल, सतीश शाह, गोविंद नामदेव, शक्ति कपूर, स्मिता जयकर आणि दिलीप जोशी हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 13, 2025 7:16 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Shah Rukh Khan : ब्लॉकबस्टर सिनेमांचा 'किंग', पण 'त्या' सिनेमावेळी ढसाढसा रडला होता शाहरुख, असं घडलं काय?