शनिदेव कृपादृष्टी दाखवणार! 2025 च्या शेवटपर्यंत 5 राशी श्रीमंत होणार, बक्कळ पैसा मिळणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 2025 हे वर्ष अनेक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानले जात आहे. या वर्षी प्रमुख ग्रहांच्या हालचालींमध्ये मोठे बदल झाले आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे शनिदेवांचा राशीप्रवेश.
मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 2025 हे वर्ष अनेक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानले जात आहे. या वर्षी प्रमुख ग्रहांच्या हालचालींमध्ये मोठे बदल झाले आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे शनिदेवांचा राशीप्रवेश. मार्च 2025 मध्ये शनिदेवांनी गुरुची मीन रास गाठली आणि या बदलाचा परिणाम सर्व राशींवर दिसू लागला. आता वर्षाचा शेवट जवळ येत असताना, काही निवडक राशींवर शनिदेवांची विशेष कृपा होणार असल्याचे ज्योतिषी सांगत आहेत.
advertisement
शनि ग्रहाचे स्थान आणि प्रभाव शनि हा ग्रह संथ गतीने चालतो आणि एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. त्यामुळे त्याचा शुभ-अशुभ प्रभाव दीर्घकाळ जाणवतो. 29 मार्च 2025 रोजी शनिदेव मीन राशीत प्रवेश करून 3 जून 2027 पर्यंत तिथेच स्थिरावतील. यामुळे काही राशींवर साडेसातीची सुरुवात तर काहींवर साडेसातीचा शेवट होणार आहे. तरीदेखील, 2025 च्या अखेरीस काही राशींना शनीचे आशीर्वाद लाभणार आहेत.
advertisement
कर्क रास - कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेषतः फायदेशीर ठरणार आहे. वर्षाच्या अखेरीस शनि आणि शुक्र या राशीच्या आठव्या घरात एकत्र येणार आहेत. या संयोगामुळे आर्थिक स्थितीत मोठी वाढ होईल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे यश आणि स्थिरता मिळेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement