आजचं हवामान: दिवाळीपर्यंत पावसाचा मुक्कम? पुढचे तीन दिवस IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मराठवाड्यात, रायगड, पनवेल, वर्धा, चंद्रपूर, परभणीसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज; यशोदा नदीला पूर, वाहतूक व जनजीवन विस्कळीत, मूग पिकाचे नुकसान.
मुंबई: मराठवाड्यात मुसळधार पावसाची नोंद मागच्या 24 तासात करण्यात आली. तर रायगड आणि पनवेल या भागांमध्ये शुक्रवारी संध्याकाळपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे. मात्र सलग पाऊस न होता मुसळधार पाऊस होत आहे. थोडावेळ विश्रांती घेत आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पश्चिम बंगालकडून वारं आतल्या दिशेनं सरकत असल्याने महाराष्ट्रात देखील त्याचा परिणाम होणार आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागरात खालपासून आडवी रेघ कमी दाबाच्या पट्ट्याची तयार झाली आहे जी अरबी समुद्रापर्यंत जात आहे. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नवरात्रौत्सव आणि दिवाळीपर्यंत पावसाचा मुक्काम राहील. सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. राज्यात पुन्हा एकदा 14 सप्टेंबरपासून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
advertisement
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक, घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी.
advertisement
वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे यशोदा नदीला पूर आला. पुरामुळे वर्धा-राळेगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. तर अनेक घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सतत पावसामुळे वरोरा, चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक मार्ग बंद झालेत. दरम्यान दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सलग पुढचे दोन दिवस आता मुसळधार पाऊस राहणार आहे.
advertisement
पाच ते सहा दिवसाच्या उघडीनंतर, परभणी जिल्ह्यात मागील चार दिवसापासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून, या पावसामुळे शेतातील मूग पिकाला मोठा फटका बसत आहे. मुगाचे पीक ऐन काढणीमध्ये आलेल असताना, झालेल्या या पावसामुळे मूग काळा पडतोय. तर दुसरीकडे अळ्या आणि किडीचा देखील प्रादुर्भाव वाढला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास, निसर्गाने पुन्हा एकदा हिरावून घेतला आहे. येणाऱ्या काळात पावसाने उघडीप नाही दिली तर, मुगाच्या एकूण उत्पन्नावर देखील याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 13, 2025 7:15 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजचं हवामान: दिवाळीपर्यंत पावसाचा मुक्कम? पुढचे तीन दिवस IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा