कृषी हवामान : तुफान आलं! परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट, शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Maharashtra Weather Update : राज्यात मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान निर्माण झाले असून, त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांसाठी विजांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई : राज्यात मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान निर्माण झाले असून, त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज (ता.१३ सप्टेंबर) लातूर आणि नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर इतर अनेक जिल्ह्यांसाठी विजांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामानाची स्थिती
बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे तयार झाले असून, त्यातून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ही प्रणाली उद्यापर्यंत जमिनीवर येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसरपासून दक्षिण-मध्य महाराष्ट्रापर्यंत सक्रिय आहे.
यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण वाढले असून, तापमानातही चढ-उतार सुरू झाले आहेत. शुक्रवारी (ता.१२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी व वर्धा येथे उच्चांकी ३३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे तब्बल ८० मिमी पावसाची नोंद झाली.
advertisement
हवामान विभागाचा इशारा
(ऑरेंज अलर्ट) : लातूर, नांदेड
(येलो अलर्ट) : सिंधुदुर्ग, सोलापूर, परभणी, हिंगोली, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशीव, बीड, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा
शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन
या पार्श्वभूमीवर खरीप पिके आणि कांद्याच्या रोपवाटिकेवर योग्य फवारणी करणे महत्त्वाचे आहे. सततचा पाऊस आणि दमट हवामानामुळे कीड व रोगराईचा धोका वाढतो. कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या सूचना पुढीलप्रमाणे आहेत.
advertisement
कांदा रोपवाटिका संरक्षण
थ्रिप्स व पांढरी माशी नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८ एस.एल. किंवा थायोमेथोक्साम २५ डब्ल्यू.जी. या औषधांची शिफारस केलेल्या प्रमाणात फवारणी करावी. पानांवर पडणाऱ्या डागांपासून (लीफ ब्लाइट) बचावासाठी मॅन्कोझेब ७५ डब्ल्यू.पी. किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड यांचा वापर करावा.
खरीप पिके (सोयाबीन,तूर, कपाशी)
सोयाबीन पिकावर अळी व माशीच्या प्रादुर्भावासाठी स्पायनोसॅड किंवा क्लोरान्ट्रानिलिप्रोल यांची फवारणी करावी. तुरीवर मर रोग आणि शेंगावरील अळीसाठी कार्बेन्डाझिम व लॅम्डा सायहॅलोथ्रिन मिश्र फवारणी उपयुक्त ठरते.कपाशीवर बोंडअळी व रसशोषक कीटक नियंत्रणासाठी फ्लुबेंडियामाईड किंवा असेटामिप्रिड वापरता येईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 13, 2025 7:45 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : तुफान आलं! परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट, शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?