Weather Alert: कोकणात वारं फिरलं, वीकेंडला धो धो कोसळणार, मुंबई-ठाण्यासाठी महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कोकणात पाऊस पुन्हा सक्रीय होत असून दुपारनंतर जोरदार पावसाचा अंदाज आह.
1/5
गेल्या आठवडाभरापासून कोकण किनारपट्टीवर हवामानाची स्थिती बदलती राहिली. काही भागात उकाड्याने लोक हैराण झाले तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत होता. आजही मुंबईसह कोकणात अशीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून याठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

advertisement
2/5
मुंबईत आज सकाळपासून ढगाळ वातावरण राहणार असून काही भागात हलक्या सरी पडतील. दुपारनंतर काही ठिकाणी थोडासा पाऊस वाढू शकतो. तापमान 26°से ते 31 °से दरम्यान राहील. दमट हवामानामुळे उकाडा जाणवेल, वाऱ्याचा वेग साधारण 12-15 किमी प्रतितास असेल.

3/5
ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये आज हवामान जवळपास सारखं राहणार आहे. काही भागात हलक्या रिमझिम सरी तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. सलग ढगाळ वातावरण असल्याने आर्द्रता वाढलेली जाणवेल आणि उकाडाही जाणवू शकतो. किमान तापमान 24 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 29–30 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. वाऱ्याचा वेग 20–25 किमी प्रतितास राहील.

4/5
रायगड, रत्नागिरी या दोन्ही किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर मध्यम स्वरूपाचा राहील. काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांप्रमाणेच समुद्र खवळलेला राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

5/5
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा जोर लक्षणीय वाढेल. मुसळधार ते अतिमुसळधार सरींची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. दुपारनंतर व संध्याकाळी मुसळधार पावसामुळे स्थानिक ठिकाणी पाणी साचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान 24 अंश सेल्सिअस राहील. वारे 30 किमी प्रतितास वेगाने वाहण्याचा अंदाज आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement