अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांना लग्नाच्या चार वर्षांनी मुलगी झाली आहे. "आम्ही खूप आनंदी आहोत. देवाने आम्हाला एका गोंडस मुलीचे वरदान दिलं आहे", असं म्हणत राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी पोस्ट शेअर केली आहे. राजकुमार रावने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "आमच्या चौथ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त देवाने आम्हाला दिलेला हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे."
advertisement
अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा आई बाबा झाल्याचं कळताच चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे तसंच नुकत्याच जन्मलेल्या त्यांच्या मुलीला खुपसारे आशीर्वाद दिलेत.
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी 15 नोव्हेंबर 2021 साली लग्न केलं. दोघेही 11 वर्ष एकमेकांना डेट करत होते. राजकुमार आणि पत्रलेखा यांना चंदीगडमध्ये शाही थाटात लग्न केलं होतं. त्यांची पहिली भेट 2010 साली झाली होती. 2014 साली आलेल्या सिटीलाइट्स या सिनेमात ते एकत्र दिसले होते.
अभिनेत्री पत्रलेखा प्रेग्नंसी दरम्यान तिचं रुटीन चाहत्यांबरोबर शेअर करत होती. तिने बेबी बंपसोबतचे अनेक फोटो देखील शेअर केले होते. दरम्यान एका मुलाखतीत बोलताना पत्रलेखाने प्रेग्नंसीसाठी एग्ज फ्रीज केल्याचं सांगितलं होतं. एग्ज फ्रीज करण्यापेक्षा नॅशरल प्रेग्नंसी कधीही चांगली आहे, असा सल्ला तिने चाहत्यांना दिला होता. पत्रलेखाला एग्ज फ्रीज ते प्रेग्नंसी दरम्यान अनेक समस्यांचा सामना करावा लागला असंही तिने सांगितलं.
