TRENDING:

रश्मिका, तृप्तीचं नाही तर रणबीरनं चक्क बॉबी देओललाही केलं किस; आता OTT वर दिसणार दोघांचा तो सीन?

Last Updated:

Animal' या चित्रपटात बॉबी देओल आणि रणबीर कपूरमध्ये कट्टर दुश्मनी दाखवली असली तरी शेवटी या दोघांचा एक किसिंग सिन शूट करण्यात आल्याची माहिती बॉबीने दिली होती. पण शेवटच्या क्षणी हा सीन चित्रपटातून काढून टाकण्यात आला. पण आता ओटीटीवर हा सीन दिसणार का याविषयी माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 18 डिसेंबर : संदीप रेड्डी वंगाच्या 'अ‍ॅनिमल'चा बॉक्स ऑफिसवर अजूनही दबदबा कायम आहे. रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या या सिनेमानं देशभरात अक्षरशः धुमाकूळ घातला. थिएटरमध्ये चक्क तीन तास चाललेल्या या चित्रपटाचं ओटीटी व्हर्जन अजून धमाकेदार असल्याचं बोललं जात आहे. ओटीटीवर 'अ‍ॅनिमल'चा कालावधी जास्त असेल अशा बातम्या आल्या होत्या. सुमारे चार तासांचा चित्रपट असू शकतो. तसेच चित्रपटात थिएटरमध्ये न दाखवले गेलेले काही वादग्रस्त सीन ओटीटीवर पाहायला मिळतील असं सांगण्यात येत आहे. या चित्रपटात बॉबी देओल आणि रणबीर कपूरमध्ये कट्टर दुश्मनी दाखवली असली तरी शेवटी या दोघांचा एक किसिंग सिन शूट करण्यात आल्याची माहिती बॉबीने दिली होती. पण शेवटच्या क्षणी हा सीन चित्रपटातून काढून टाकण्यात आला. पण आता ओटीटीवर हा सीन दिसणार का याविषयी माहिती समोर आली आहे.
अ‍ॅनिमल
अ‍ॅनिमल
advertisement

बॉबी देओलने या चित्रपटात त्याच्या आणि रणबीर कपूरमध्ये जबरदस्त किसिंग सीन होता असा खुलासा केला आहे. पण शेवटच्या क्षणी निर्मात्यांनी हा सीन काढून टाकला. चित्रपटाच्या या दृश्याविषयी बोलताना बॉबी देओल म्हणाला की, चित्रपटाची लांबी हे यामागचे मुख्य कारण आहे. अभिनेत्याने सांगितले की हा चित्रपट सुरुवातीला 3 तास 51 मिनिटांचा ठेवण्यात आला होता. पण नंतर हा चित्रपट खूप मोठा होत असल्याकारणामुळे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी ते 30 मिनिटे कमी केले. त्यानंतर चित्रपटाची लांबी 3 तास 21 मिनिटे ठेवण्यात आली.

advertisement

सलमाननं केलं लॉन्च, ऐश्वर्या रायची डुप्लिकेट म्हणून मिळाली ओळख; अचानक इंडस्ट्रीतून कुठे गायब झाली ही अभिनेत्री?

पण आता चित्रपटाच्या OTT व्हर्जनबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे. या चित्रपटात जे सीन थिएटर रिलीजच्या वेळी कापले गेले होते, ते ओटीटीवर पाहता येतील असं चाहत्यांना वाटत होतं. त्याचमुळं रणबीर आणि बॉबीचा किसिंग सीनही पाहायला मिळेल असं चाहत्यांना वाटत होतं. पण आता चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. कारण ओटीटीवर जेवढा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज केला गेला तेवढाच OTT वरही दाखवण्यात येणार आहे.

advertisement

'Animal' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. सेन्सॉर बोर्डानं पास केलेलं व्हर्जनच आता OTT वरही रिलीज केलं जाणार असल्याचं नेटफ्लिक्सने सांगितलं आहे. नेटफ्लिक्सने भारतीय चित्रपट अनकट आणि अनसेन्सॉर रिलीज करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच आता रणबीर आणि बॉबीचा किसिंग सीन OTT वर पाहायला मिळणार का याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

advertisement

'Animal' नेटफ्लिक्सवर या OTT प्लॅटफॉर्मवर कधी रिलीज होईल याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. सध्या तो बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. त्याचे जगभरातील कलेक्शन 750 कोटींहून अधिक आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
रश्मिका, तृप्तीचं नाही तर रणबीरनं चक्क बॉबी देओललाही केलं किस; आता OTT वर दिसणार दोघांचा तो सीन?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल