विरल भयानीवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात नीतू कपूर आणि त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर एअरपोर्टमधून बाहेर पडून कारमध्ये बसण्यासाठी जात आहेत. तेवढ्यात त्यांना पापाराझी घेरतात. नीतू कपूरच्या मागून एक मुलगी बाहेर येते. ब्लॅक कलरचा टॉप आणि जिन्स वेअर केलेली, चेहऱ्यावर चकाकी आणि मोकळे केस असा लुक असलेली मुलगी पापाराझींसमोर येते. पापाराझींना पाहताच ती हसू लागते. त्यांच्याशी गप्पा मारते. तिने पापाराझींना तुमचा दिवस कसा केला असंही विचारलं. ती पापाराझींना फोटो देण्यासाठी पोझेसही देत होती.
advertisement
कोण आहे समारा साहनी ?
व्हिडीओमध्ये दिसणारी ही मुलगी नीतू कपूर यांची नात आहे. म्हणजेच रिद्धिमा कपूरची मुलगी आणि रणबीर-आलिया यांची भाची आहे. समारा साहनी असं तिचं नाव आहे. ती मामा रणबीर कपूरसारखीच दिसतेय. काही महिन्यांआधीच जेह अली खानच्या बर्थडे पार्टीसाठी समारा स्पॉट झाली होती. तिची पापाराझींना फोटो देण्याची क्रेझ पाहून सगळेच शॉक झालेले.
एका जुन्या मुलाखतीत बोलताना रिद्धिमाने तिची मुलगी समारा ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं कन्फर्म केलं होतं. ती म्हणाली होती, सॅम, 110% ती सिनेमात दिसणार. आमच्या घरातला प्रत्येक जण इंडस्ट्रीत येणार कारण ते त्यांच्या रक्तात आहे.