बॉलिवूडचा हँडसम हिरो, ज्याने रवीना टंडनच्या हातावर केली होती उलटी; अभिनेत्रीने सांगितला विअर्ड किस्सा, VIDEO

Last Updated:

Raveena Tandon Weird Story : सेटवर कधी कधी लहान मुलांना सांभाळता सांभाळता मोठ्यांच्या नाकीनऊ येतात. अभिनेत्री रवीना टंडनच्या बाबतीतही असंच काहीसं झालं होतं.

News18
News18
मुंबई : शूटिंगच्या सेटवर कलाकार एकमेकांना सांभाळून शूटिंग करत असतात. सेटवर जर महान मुलं असतील तर सगळे जास्तच काळजी घेतात. लहान मुलांना खुश ठेवून त्यांच्याकडून काम करून घेणं हा एक टास्क असतो. पण कधी कधी लहान मुलांना सांभाळता सांभाळता मोठ्यांच्या नाकीनऊ येतात. अभिनेत्री रवीना टंडनच्या बाबतीतही असंच काहीसं झालं होतं. एका बालकालाकारांची उलटी रवीनाला तिच्या हातात घ्यावी लागली होती.
90 च्या दशकात बॉलिवूडवर गाजवणाऱ्या रवीनाने तिच्या करिअरची सुरुवात जाहिरातींमधून केली होती. ती दहावीत शिकत असताना प्रसिद्ध दिग्दर्शक प्रल्हाद कक्कर यांच्या सोबत एका टूथपेस्टच्या जाहिरातीत काम केलं होतं. या जाहिरातीत तिच्यासोबत आफताब शिवदासानी हा बालकलाकार होता. तेव्हा सेटवर एक मजेशीर गोष्ट घडली होती.
advertisement
रवीना करत असलेल्या टुथपेस्टच्या जाहिरातीत असं दाखवण्यात आलं होतं की, एक छोटा मुलगा ( आफताब ) खूप चॉकलेट खात असतो. तो सांगत असते की त्याची टूथपेस्ट इतकी प्रभावी आहे आणि त्याच्या दातांना काहीच इजा करत नाही. रवीनाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात तिने सेटवरचा तो संपूर्ण प्रसंग सांगितला. रवीना म्हणाली, त्या दिवशी प्रल्हाद कक्कर यांनी तब्बल 22-23 टेक घेतले पण त्यांना हवा तसा शॉट मिळाला नव्हता.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by MÍX MÁNÌA (@mixmania2023)



advertisement
शूटिंगच्या या लांबलेल्या वेळेत आफताबची तब्येत बिघडू लागली.चॉकलेट खाऊन खाऊन आफताबची तब्येत बिघडली. रवीनाने पाहिलं की, आफताब सतत आपलं तोंड दुसरीकडे वळवत आहे. त्याला उलटी होणार आहे. रवीना म्हणते, " डायरेक्टर खूप स्ट्रिक्ट होते. त्यांना सेट जराही खराब झालेला चालत नव्हता. एक ड्रॉप सेटवर पडता कामा नये. संपूर्ण सेट व्हाइट कलरचा होता. आफताबला उलटी होत होती. सेट खराब होऊ नये म्हणून मी लगेच त्याला एखादा बॉक्स किंवा वापरता येईल अशी वस्तू शोधू लागले. पण काहीच सापडलं नाही. मी त्याच्या पुढ्यात माझा हात केला त्याने माझ्या हातात उलटी केली. मी लगेच हात धुण्यासाठी पळाले." ही घटना आठवून रवीना आजही हसून हसून लोटपोट होते.
advertisement
आफताब हा बॉलिवूडचा हँडसम हिरो आहे. त्याने बालकलाकार म्हणून मिस्टर इंडिया, चालबाज, शहंशाह, इंसानियत सारख्या सिनेमात काम केलं आहे. पुढे त्याने निर्मिती क्षेत्रातही नाव कमावलं.
मराठी बातम्या/मनोरंजन/
बॉलिवूडचा हँडसम हिरो, ज्याने रवीना टंडनच्या हातावर केली होती उलटी; अभिनेत्रीने सांगितला विअर्ड किस्सा, VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement