अभिनेता आयुष्मान खुराना, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना यांच्या ‘थामा’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि आता त्यातील ‘तुम मेरे न हुए’ या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
या टीझरमध्ये रश्मिका मंदानाचा अत्यंत बोल्ड आणि सिझलिंग अवतार पाहायला मिळत आहे. रश्मिका आणि आयुष्मानचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. विशेष म्हणजे, रश्मिकाचा हा लुक काही चाहत्यांना अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या ‘आज की रात’ गाण्यातील लुकची आठवण करून देत आहे.
advertisement
व्हॅम्पायरची प्रेम कहाणी
‘तुम मेरे न हुए’ या टीझरला कॅप्शन देण्यात आले आहे की, “प्रत्येक मुलीच्या प्रेमाचा आणि हृदय तुटण्याचा आवाज ऐका.” हे पूर्ण गाणं लवकरच रिलीज होणार आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हॉरर आणि कॉमेडीचा धमाकेदार तडका आहे. नवाजुद्दीन आणि परेश रावलच्या कॉमेडीने आधीच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. ‘थामा’ची कथा एका व्हॅम्पायरच्या प्रेम कहाणीवर आधारित आहे. यात आयुष्मान रश्मिकाला भेटल्यावर वैम्पायर बनतो आणि त्याला सुपर नॅचरल पॉवर्स मिळतात.
दिनेश विजन आणि अमर कौशिकने निर्मिती केलेला आणि आदित्य सरपोतदारने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २१ ऑक्टोबर २०२५ रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यास सज्ज आहे.