अभिनेत्री रिंकू राजगुरूने यंदा वडिलांसोबत पंढरपूरच्या वारीत सहभाग घेतला. तिने या क्षणाचा खास व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
प्राजक्ता माळीने सोडला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो? 'या' कारणामुळे रंगली चर्चा!
रिंकू राजगुरु वारीत झाली सहभागी
कपाळी गंध, हातात टाळ आणि पायात ठेका धरत रिंकूने वारीचा आनंद घेतला. पारंपरिक नऊवारी साडी, नाकात नथ आणि डोक्यावर तुळस घेऊन ती पारंपरिक मराठमोळ्या रूपात दिसली. विशेष म्हणजे ती वडिलांसोबत फुगडी खेळताना आणि इतर महिला वारकऱ्यांमध्ये मिसळून पारंपरिक खेळांमध्ये सहभागी होताना दिसली. तिच्या आनंदात भक्तीची झलक स्पष्टपणे दिसत होती.
advertisement
रिंकूने तिच्या इंस्टाग्रामवर वारीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि त्याखाली लिहिलं, “जय जय राम कृष्ण हरी! मी वयाच्या 4 व्या वर्षी माझ्या बाबांसोबत वारीत गेले होते. आज तब्बल 20 वर्षांनी पुन्हा तेच क्षण जगतेय... हे क्षण माझ्या हृदयात कायमचे कोरले गेले आहेत.”
हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. “तुझं साधेपण मनाला भावलं”, “तू खरी कलाकार आहेस, जमिनीवर पाय ठेवून चालणारी” अशा अनेक सकारात्मक प्रतिक्रियांनी तिच्या व्हिडीओवर पहायला मिळत आहेत. विठ्ठलाच्या नामस्मरणात गुंग झालेली रिंकू राजगुरू आता चाहत्यांच्या हृदयातही अधिकच जागा निर्माण करत आहे.