Prajakta Mali: प्राजक्ता माळीने सोडला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो? 'या' कारणामुळे रंगली चर्चा!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Prajakta Mali: 'व्वा दादा व्वा' या एका छोट्या वाक्याने प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी. ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमाचा अविभाज्य भाग आहे.
मुंबई: 'व्वा दादा व्वा' या एका छोट्या वाक्याने प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी. ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमाचा अविभाज्य भाग आहे. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळून तिने चाहत्यांच्या मनात घर केलं. मात्र गेल्या काही काळापासून हास्यजत्रेविषयी अनेक अनेक अपडेट समोर येत आहेत. सोशल मीडियावर प्राजक्ताने हा शो सोडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रेत दिसत नाही. तिच्या जागी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर सूत्रसंचालनाची धुरा सांभाळात आहे. त्यामुळे प्राजक्ताला जास्त काळ शोमध्ये पाहिलं नसल्यामुळे चाहते चिंतेत आहेत की तिने शो सोडला की काय?
सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, प्राजक्ता माळीने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो पूर्णपणे सोडलेला नाही. मात्र, काही वेळा तिला इतर प्रोजेक्ट्स किंवा वैयक्तिक कामांसाठी शोमधून ब्रेक घ्यावा लागला होता. अद्याप याविषयी अधिकृत माहिती समोर आली नाहीये.
advertisement
दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवाणी, हास्याचा डोस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करत आहे. प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी आजवर भरभरुन प्रेम दिलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 02, 2025 9:42 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Prajakta Mali: प्राजक्ता माळीने सोडला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो? 'या' कारणामुळे रंगली चर्चा!


