रिंकू राजगुरू काय म्हणाली?
रिंकू राजगुरूला एकटं वाटतं तेव्हा ती सिद्धिविनायक मंदिरात जाऊन शांती अनुभवते. रिंकू राजगुरू म्हणाली,"काम...घर...काम...घर एवढचं करणारी मी मुलगी आहे. मी खूप कमी फिरते. मी सिद्धिविनायकला जाते. कारण माहिती नाही. पण मला मंदिर आवडतात. मुंबईत माझी फॅमिली नाही. तसं कोणी नाही. तर मला जेव्हा कधी काही काम नसेल किंवा करमत नसेल, एकटं वाटत असेल तर मी सिद्धिविनायक जाऊन बसते. मला मजा येते".
advertisement
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर बॉलिवूडकरांसह मराठी सेलिब्रिटींसाठीही खूप खास आहे. अनेकदा सेलिब्रिटी सिद्धिविनायक मंदिराच्या आवारात स्पॉट होत असतात. आपल्या चित्रपटाची घोषणा अनेकदा ते सिद्धिविनायकाचरणी करत असतात. यासर्वांप्रमाणेच रिंकूसाठीदेखील सिद्धिविनायक खास असल्याचं आता समोर आलं आहे.
रिंकू राजगुरूचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरू असं आहे. आजवर तिने तंदुरुस्त राहण्याला महत्त्व दिलंय. लॉकडाउन काळात तिने फिटनेसवर भर दिला. वजन कमी करण्यासाठी आहार, व्यायाम, वर्कआउट अशा गोष्टींचा समावेश असल्याचं रिंकू म्हणाली आहे. तिने आपल्या सौंदर्यालादेखील तेवढचं महत्त्व दिलं आहे. 'सैराट' या चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणाऱ्या रिंकूचे कागर, मेकअप, 200 हल्ला हो, झुंड हे चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.
रिंकूचा आगामी चित्रपट कोणता?
अंकुश चौधरी दिग्दर्शित 'पुन्हा एकदा साडे माडे 3' या बहुचर्चित चित्रपटात रिंकू राजगुरू महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. अशोक सराफ, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे अशा दिग्गज कलाकारांसोबत रिंकू स्क्रीन शेअर करणार आहे. येत्या 14 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.