‘राईज अँड फॉल’च्या एका व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये अरबाज पटेल धनश्री वर्माला सल्ला देताना दिसत आहे. तो तिला सांगतो की, तिने इतर स्पर्धकांना मिठी मारू नये, फक्त ‘साईड हग’ द्यावं. अरबाजचा हा ‘पजेसिव्ह’ स्वभाव पाहून सगळेच थक्क झाले. यावर धनश्रीने त्याला स्पष्टपणे सांगितलं की, तिला लोकांना मिठी मारायला आवडतं आणि ती तसंच वागेल. अरबाजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.
advertisement
धनश्रीसाठी पजेसिव्ह झाला अरबाज पटेल?
Arbaz and dhanashree ⚡️
Arbaaz ko dhanashree ❤️ se payar ho gaya he....🥰🥰🔥🔥🔥#RiseandFall #dhanashreeeveerma#ArbazPatel #ArjunBijlani #akritinegi pic.twitter.com/SyjWyPWTDP
— Marco
सोशल मीडियावर अनेक चाहते अरबाजला ट्रोल करत आहेत. एका चाहत्याने म्हटलं की, “अरबाजने बिग बॉसमध्ये निक्कीसोबत असं केलं होतं आणि आता तो धनश्रीसोबत असाच कंट्रोलिंग स्वभाव दाखवत आहे.” दुसऱ्या एका चाहत्याने म्हटलं, “बिचारी निक्की तांबोळी! ती हे सगळं डिझर्व करत नाही. अरबाज तिला धोका देत आहे.”
निक्की तांबोळीचं सडेतोड उत्तर
या सगळ्या वादावर निक्की तंबोलीनेही एक व्हिडिओ शेअर करून प्रतिक्रिया दिली होती. तिने कुणाचंही नाव न घेता म्हटलं, “मी कधीही कुणाच्या मदतीने पुढे आलेली नाही.”
इतकंच नाही, तर निक्कीने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर काही स्टोरी शेअर केल्या आहेत, ज्यानंतर काही चाहत्यांनी असा अंदाज लावला आहे की, निक्कीने या स्टोरी तिच्या बॉयफ्रेंडलाच उद्देशून शेअर केल्या आहेत.