TRENDING:

Saiyaara : सैयाराचं वेड अजूनही कायम! 500 कोटींची कमाई; आता नवा रेकॉर्ड, तो काय?

Last Updated:

Saiyaara Song Barbaad 100 million Views : 'सैयारा' हा बहुचर्चित चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. अशातच या चित्रपटातील 'बरबाद' या गाण्याला युट्यूबवर 100 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Saiyaara : अहान पांडे आणि अनीत पड्डा अभिनीत 'सैयारा' हा चित्रपट भारतासह जागतिक पातळीवरही लोकप्रिय ठरत आहे. मोहित सूरी दिग्दर्शित भावनिक प्रेमकथेच्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडल्यानंतर हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. चित्रपटाचे कथानक, कलाकारांचा अभिनय, मोहितचं दिग्दर्शन या सगळ्यासह या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. अशातच 'सैयारा' या चित्रपटाने नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. या चित्रपटातील 'बर्बाद' गाण्याला युट्यूबवर 100 मिलियनपेक्षा (Saiyaara Song Barbaad 100 million View) अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याआधी या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकने रेकॉर्ड केला होता. YRFच्या बॅनरअंतर्गत आणि मोहित सूरी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेलं 'बर्बाद' हे गाणं त्याची भावनिक कथाविषयक मांडणी आणि सुरेल संगीतामुळे प्रेक्षकांच्या मनाला भिडलं आहे.
News18
News18
advertisement

अ‍ॅपल म्युझिक, जिओसावन, बिलबोर्ड इंडिया आणि BBC आशियन चार्ट्समध्ये आघाडीवर असलेल्या 'बर्बाद' या गाण्याच्या अर्थपूर्ण मांडणीसाठीदेखील खूप प्रशंसा होत आहे. या गाण्याच्या यशाबद्दल प्रतिक्रिया देत संगीतकार ऋषभ कांत म्हणाला,"प्रेमात पडायला घाबरणाऱ्या 100 मिलियन लोकांना या गाण्यातून धैर्य मिळतंय. हे माझं पहिलं 100 मिलियन पार केलेलं गाणं आहे आणि ‘बर्बाद’ला आणखी बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे". 'सैयारा'चा साऊंडट्रॅक त्याच्या हृदयस्पर्शी आणि जोशपूर्ण ट्रॅक्समुळे एका वेगळ्याच वळणावर गेला आहे. त्यामुळे 2025 मधील सर्वाधिक चर्चिला गेलेला हा बॉलिवूड अल्बम ठरला आहे. या अल्बममध्ये फहीम अब्दुल्ला, तनिष्क बागची, अर्सलान निजामी आणि मिथून यांसारख्या प्रतिभावान संगीतकारांचा सहभाग आहे.

advertisement

Bigg Boss 19 : 'माझ्या गर्लफ्रेंड होत्या तेव्हा आईचे बॉयफ्रेंड होते'; हिरोईनच्या मुलाचा शॉकिंग खुलासा

'सैयारा'च्या गाण्यांनी लावलंय वेड

'सैयारा' हे टायटल साँग फहीम अब्दुल्ला यांनी गायलं आहे तर अर्सलान निजामी यांनी संगीतबद्ध केलं आहे. प्रदर्शित होताच हे गाणं सुपरहिट ठरलंय. हे गाणं Spotify च्या ग्लोबल टॉप 50 मध्ये पोहोचलं आणि Billboard Global Excl. US चार्टमध्ये चौथ्या स्थानावर आहे. समीक्षकांनी या गाण्याच्या भावनात्मक गोष्टीचं भरभरून कौतुक केलं आणि त्याला "गुणगुणायला सोपं, पण डोकं हलवायला लावणारं” असं गाणं असल्याचं म्हणाले. जुबिन नौटियाल यांनी गायलेलं 'बर्बाद' हे गाणं भारतात रेकॉर्डवर रेकॉर्ड करत आहे आणि Billboard Global 200 मध्ये देखील या गाण्याने एन्ट्री मिळवली आहे. चाहत्यांनी या गाण्याच्या गायकीसह ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीचंही खूप कौतुक केलं. दरम्यान, मिथूनचं 'धुन' हे गाणं अरिजीत सिंहने गायलं आहे. हे गाणं Spotify च्या Global Top 100 मध्ये पदार्पण करताच भारतातील India Songs चार्टमध्ये थेट #2 स्थानावर पोहोचलं.

advertisement

'सैयारा'बद्दल जाणून घ्या...

'सैयारा' या चित्रपटात कष्टाळू संगीतकार कृश कपूर आणि महत्त्वकांभी पत्रकार-कवयित्री वाणी बत्रा यांची गोष्ट दाखविण्यात आली आहे. कृश हा वाणीच्या डायरीतील कविता गाण्यांमध्ये रूपांतरित करतो आणि तिला आपली गीतकार बनवतो. त्यांच्या या सहकार्याचं रूपांतर हळूहळू एका सुंदर प्रेमकथेत होतं, परंतु नशिब त्यांना वेगळ्या मार्गावर नेऊन ठेवतं. या चित्रपटाला त्याच्या भावनिक खोलीसाठी, दमदार अभिनयासाठी आणि अविस्मरणीय साऊंडट्रॅकसाठी प्रचंड प्रशंसा मिळाली. 'छावा'नंतर 2025 मधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलेल्या 'सैयारा'ने जगभरात 500 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. 'सैयारा' भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात जास्त कमाई करणारा रोमँटिक चित्रपट ठरला आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Saiyaara : सैयाराचं वेड अजूनही कायम! 500 कोटींची कमाई; आता नवा रेकॉर्ड, तो काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल