TRENDING:

लेखक सलीम खान यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल; सलमान खानही पोहोचला

Last Updated:

Salim Khan Hospitalized : सलीम खान यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सलमान खानही रुग्णालयात पोहोचला आहे. प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज पटकथा लेखक सलीम खान यांची प्रकृती बिघडली असून यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते 90 वर्षांचे आहेत. लीलावती रुग्णालयाबाहेरील व्हिडीओ समोर आला आहे.  सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यांच्या रुग्णालयात दाखल होण्याचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. पण त्यांचा मुलगा सलमान खानही लिलावती रुग्णालयात पोहोचला आहे.
News18
News18
advertisement

लीलावती रुग्णालयाबाहेरचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात सलमान खान वडिलांना भेटण्यासाठी रुग्णालयात जाताना दिसत आहे. सलमानच्या भोवती त्याची सिक्युरिटी दिसत आहे. दरम्यान सलीम खान यांना नेमकं काय झालं आहे याची माहिती खान कुटुंबाकडून अद्याप देण्यात आलेली नाही. सलीम खान यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येताच चाहत्यांची चिंता वाढली आहे.  सोशल मीडियावर चाहत्यांची चिंता व्यक्त केली आहे.  हजारो लोक त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

advertisement

90 वर्षीय सलीम खान हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रभावशाली लेखकांपैकी एक मानले जातात. त्यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा केला. सलमानने स्वत: वडिलांच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ट्रेंडिंग चॉकलेट बाउल, 70 रुपयांपासून चाखा चवं,मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?
सर्व पहा

सलीम खान जावेद अख्तर यांची जोडी बॉलिवूडमध्ये खूप गाजली. 70च्या दशकात या जोडीने हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. शोले, दीवार, जंजीर आणि डॉन सारख्या चित्रपटांनी केवळ बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलं. हे सिनेमे यशस्वी होण्यामागे सलीम-जावेद यांचा मोठा वाटा होता.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
लेखक सलीम खान यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल; सलमान खानही पोहोचला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल